Headlines

राधा केरकर व नेहा कोळंबकर यांचा पोलिसांकडून सन्मान

मालवण ता.२७-:* ग्लोबल रक्तदाते समूहाच्या महिला प्रतिनिधी सौ. राधा गोविंद केरकर आणि सौ. नेहा गणेश कोळंबकर यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांचा सत्कार पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग राजेंद्र दाभाडे यांच्या पत्नी सौ. समिक्षा दाभाडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मालवण पोलीस निरीक्षक ओटवणेकर यांच्या पत्नी सौ. सुप्रिया ओटवणेकर यांही उपस्थित होत्या. सिंधुदुर्ग पोलिसांच्या मालवण येथील कार्यक्रमात…

Read More

माजी जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा यांना पितृशोक…

सावंतवाडी ता.२७ कॅथलिक बँकेचे व्हाईस चेअरमन फ्रान्सिस डिसोजा यांचे गोवा येथे आज उपचारादरम्यान निधन झाले. जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा यांचे ते वडील होते. त्यांच्या अचानक जाण्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

Read More

आंबोली घाटाजवळ चिरे वाहतूक करणाऱ्या डंपरला अपघात…

चालक बचावला; डंपरचे मोठे नुकसान आंबोली ता.२७-:चिरे वाहतूक करणाऱ्या एका डंपरचा आंबोली घाटाजवळ अवघ्या ७ किलो मिटर अंतरावर अपघात झाला असून, रस्त्याचा अंदाज न आल्याने डंपर थेट खाली कोसळला आहे. हा अपघात आज भल्या पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास घडला असून, योग्य वेळी डंपर चालकाने बाहेर उडी मारल्याने तो बचावला असून, डंपरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले…

Read More

युवा फोरम संघटनेच्या “उमेद” अभियानाची पुन्हा एकदा सुरुवात…

सावंतवाडी ता.२६-:युवा फोरम भारत संघटनेच्या माध्यमातून पुन्हा एकदा उमेद उपक्रमाचा प्रारंभ कुडाळ येथून करण्यात आला आहे. युवा फोरमच्या माध्यमातून गेल्या एका वर्षापासून राज्यातील अनेक भागात उमेद मार्फत माझी शाळा हा उपक्रम राबवला जात असून, या माध्यमातून अनेक भागात राहणाऱ्या गरीब गरजू व वस्तीवर राहणाऱ्या मुलांना त्यांच्या वस्तीवर जाऊन शिक्षण दिले जाते . या उपक्रमाला मुलांचे…

Read More

संगणक परीक्षेमध्ये सावंतवाडी येथील प्रभावती कॉम्प्युटर्सच्या विद्यार्थ्यांचे उज्वल यश

सावंतवाडी ता.२६- : महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण व परीक्षा मंडळातर्फे जुलै २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या सर्टिफिकेट कोर्स इन इन्फॉर्मेशन टेक्नाॅलाॅजी, काॅम्प्युटर अकाऊंटीग अँड ऑफिसऑटोमेशन आणि सर्टिफिकेट कोर्स इन डीटीपी या अभ्यासक्रमांमध्ये सावंतवाडी तालुक्यातील प्रभावती काॅम्प्युटर्सच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले आहे. सावंतवाडी तालुक्यातील प्रभावती काॅम्प्युटर एज्युकेशन संस्थेच्यावतीने घेण्यात आलेल्या या परीक्षेत ७५ विद्यार्थी-विद्यार्थीनीनी ८० टक्के पेक्षा…

Read More

आदित्य ठाकरे यांच्या भेटीने विकास प्रकल्प मार्गी लागण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार…

आमदार वैभव नाईक यांची माहिती मालवण ता.२६-:* राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे २८ मार्च रोजी मालवणात येत असून पर्यटन मंत्र्यांच्या या मालवण भेटीत अनेक पर्यटन विकासाचे प्रकल्प मार्गी लागण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातील त्यामुळे इथल्या पर्यटनाला चालना मिळेल. नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पर्यटन विकासासाठी ५० कोटींची तरतूद करण्यात आली असून सुमारे २५…

Read More

हिरकणी नारीशक्ती ब्रिगेडच्या वतीने उद्या महिला उद्योग मेळाव्याचे आयोजन…

कोलगाव येथे आयोजन; सर्व सदस्यांनी उपस्थित राहण्याचे स्वप्नाली सावंत यांचे आवाहन सावंतवाडी ता.२६-:* हिरकणी नारीशक्ती ब्रिगेडच्या वतीने उद्या रविवार दिनांक २७ मार्च रोजी दुपारी २:३० वाजता महिलांसाठी कोलगाव येथील निरामय विकास केंद्र, निरुखेवाडी येथे महिला उद्योग मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून, या मेळाव्याला राष्ट्रीय अध्यक्ष सौ. हिराताई पवार, लीगल एडवाइजर पोसिक्युटर जेडी उपस्थित राहणार असून,…

Read More

पर्यटन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे २८ ला देवगड दौर्‍यावर…

विविध विकास कामांचे भूमिपूजन;कार्यकर्ते आणि ग्रामस्थांशी सुसंवाद देवगड ता.२६-: महाराष्ट्र राज्याचे पर्यटन पर्यावरण मंत्री नाम.आदित्य ठाकरे हे सोमवारी दि २८मार्च रोजी सकाळी ११वाजता देवगड तालुका दौऱ्यावर येत असून विविध विकास कामांचे भूमिपूजन ,पर्यटन विषयी विकास कामांचे लोकार्पण त्याचबरोबर नवनिर्वाचित नगराध्यक्ष नगरसेवक सत्कार ,कार्यकर्ते ग्रामस्थ यांचेशी सुसंवाद साधणार आहेत.अशी माहिती शिवसेना तालुका प्रमुख विलास साळसकर यांनी…

Read More

मालवणात होणार विभागस्तरीय टेबलटेनिस स्पर्धा

मालवण ता.२६-:* महासिंधु टेबल टेनिस असोसिएशन जिल्हा सिंधुदुर्ग आणि भंडारी हायस्कूलची दहावीची १९७१- ७२ बॅचच्यावतीने येथे १४ व १५ मे रोजी विभागीय टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष विष्णू कोरगावकर व सचिव हेमंत वालकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. मालवण चिवला बीच येथील हॉटेल गुरूज् किचन येथे पत्रकार परिषद झाली. यावेळी…

Read More

विनापास वाळूची वाहतूक करणारा डंपर महसूलने पकडला

मालवण ता.२६-:* विनापास वाळूची वाहतूक करणारा कुडाळ येथील डंपर मालवण महसूल विभागाच्या पथकाने मालवण कुडाळ मार्गावरील चौके येथे पकडला आहे. डंपर मालकास दंडात्मक कारवाईची नोटीस मालवण तहसीलदारांनी बजावली आहे. मालवण कुडाळ मार्गावरून वाळूची वाहतूक करणारा डंपर (क्र. :- KA- 22- बी- 8379) चौके येथे पेट्रोल पंप नजीकच्या रस्त्यावर महसूल विभागाच्या पथकाने अडवला असता डंपर चालकाकडे…

Read More
You cannot copy content of this page