पर्यटन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे २८ ला देवगड दौर्‍यावर…

विविध विकास कामांचे भूमिपूजन;कार्यकर्ते आणि ग्रामस्थांशी सुसंवाद

देवगड ता.२६-: महाराष्ट्र राज्याचे पर्यटन पर्यावरण मंत्री नाम.आदित्य ठाकरे हे सोमवारी दि २८मार्च रोजी सकाळी ११वाजता देवगड तालुका दौऱ्यावर येत असून विविध विकास कामांचे भूमिपूजन ,पर्यटन विषयी विकास कामांचे लोकार्पण त्याचबरोबर नवनिर्वाचित नगराध्यक्ष नगरसेवक सत्कार ,कार्यकर्ते ग्रामस्थ यांचेशी सुसंवाद साधणार आहेत.अशी माहिती शिवसेना तालुका प्रमुख विलास साळसकर यांनी दिली .

या वेळी तालुका युवा सेना प्रमुख निनाद देशपांडे उपस्थित होते. या दौऱ्यात नाम.आदित्य ठाकरे यांचे समवेत पालकमंत्री नाम.उदय सामंत ,खास.विनायक राऊत,जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर,आम.वैभव नाईक,आम.दीपक केसरकर जिल्हा प्रमुख संजय पडते,तसेच मान्यवर उपस्थित रहाणार आहेत. या दौऱ्यात तालुक्यातील मसवी येथे मुख्यमंत्री ग्रामसडक योजना रस्त्याचे भूमिपूजन ,कुणकेश्वर येथे पर्यटन विषय विकास कामां चे लोकार्पण श्री देव कुणकेश्वर दर्शन व सत्कार,मिठमुंबरी मुंब्रादेवी मुख्यमंत्री ग्रामसडक योजना रस्ता भूमिपूजन ,तेथुन देवगड कडे प्रयाण,देवगड पवनचक्की गार्डन पहाणी, त्यानंतर तहसीलदार कार्यालय समोरील मोकळ्या मैदानात नागरिक कार्यकर्ते यांचेशी सुसंवाद, नगराध्यक्ष,नगरसेवक सत्कार,उत्कृष्ट कार्य करणाऱ्या दोन बचत गटांचा सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती तालुका प्रमुख विलास साळसकर यांनी दिली.

You cannot copy content of this page