हिरकणी नारीशक्ती ब्रिगेडच्या वतीने उद्या महिला उद्योग मेळाव्याचे आयोजन…

कोलगाव येथे आयोजन; सर्व सदस्यांनी उपस्थित राहण्याचे स्वप्नाली सावंत यांचे आवाहन

सावंतवाडी ता.२६-:* हिरकणी नारीशक्ती ब्रिगेडच्या वतीने उद्या रविवार दिनांक २७ मार्च रोजी दुपारी २:३० वाजता महिलांसाठी कोलगाव येथील निरामय विकास केंद्र, निरुखेवाडी येथे महिला उद्योग मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून, या मेळाव्याला राष्ट्रीय अध्यक्ष सौ. हिराताई पवार, लीगल एडवाइजर पोसिक्युटर जेडी उपस्थित राहणार असून, मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमाला सर्व सदस्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन हिरकणी नारीशक्ती ब्रिगेड सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षा सौ. स्वप्नाली सावंत यांनी केले आहे.

You cannot copy content of this page