मालवण ता.२७-:* ग्लोबल रक्तदाते समूहाच्या महिला प्रतिनिधी सौ. राधा गोविंद केरकर आणि सौ. नेहा गणेश कोळंबकर यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांचा सत्कार पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग राजेंद्र दाभाडे यांच्या पत्नी सौ. समिक्षा दाभाडे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी मालवण पोलीस निरीक्षक ओटवणेकर यांच्या पत्नी सौ. सुप्रिया ओटवणेकर यांही उपस्थित होत्या. सिंधुदुर्ग पोलिसांच्या मालवण येथील कार्यक्रमात हा सत्कार करण्यात आला. रक्तदान व सामाजिक क्षेत्रात राधा व नेहा यांचे बहुमोल योगदान असून त्यांच्या याच सामाजिक सेवा कार्याचा सन्मान करण्यात आला.
