जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कडून आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते देण्यात आल्या बोट
मालवण : (प्रतिनिधी) किल्ले सिंधुदुर्ग व खोत जावं बेट येथील ग्रामस्थांना आपत्ती काळात वापरासाठी दोन बोट जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सिंधुदुर्ग यांच्याकडून उपलब्ध करण्यात आली असून या बोट आमदार वैभव नाईक व तहसीलदार अजय पाटणे यांच्या हस्ते संबंधित यंत्रणेकडे सुपूर्द करण्यात आल्या. मालवणच्या समुद्रातील किल्ले सिंधुदुर्ग व कालावल खाडी पात्रातील खोत जुवा बेट येथील ग्रामस्थांना पावसाळा कालावधीत समुद्र व खाडी धोकाच्या पातळीवर असतो त्यावेळी बाहेर येणाचे मार्ग बंद असतात.
अश्या आपत्कालीन स्थितीत अथवा वादळ स्थितीत येथील ग्रामस्थांना बचाव सोय उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सिंधुदुर्ग कडून एक छोटी व एक मोठी अशा दोन बोट उपल्बध करून देण्यात आल्या आहेत. आमदार वैभव नाईक व मालवण तहसीलदार अजय पाटणे यांच्या हस्ते दोन्ही बोट शनिवारी मालवण बंदर जेटी येथे आणून स्थानिक संबंधित यंत्रणेकडे देण्यात आल्या. आपतकालीन स्थितीत अथवा अत्यावश्यक परिस्थितीत या बोटी येथील ग्रामस्थ रहिवाशी यांच्यासाठी निश्चितच महत्वाची सेवा बजावतील. असे आमदार वैभव नाईक यांनी सांगितले. यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, बबन शिंदे, बाबी जोगी, मंगेश सावंत, तलाठी विजय पास्ते, तलाठी राठोड, संजय तारी आदी व इतर उपस्थित होते.
