मालवण ता.२६-:* विनापास वाळूची वाहतूक करणारा कुडाळ येथील डंपर मालवण महसूल विभागाच्या पथकाने मालवण कुडाळ मार्गावरील चौके येथे पकडला आहे.
डंपर मालकास दंडात्मक कारवाईची नोटीस मालवण तहसीलदारांनी बजावली आहे. मालवण कुडाळ मार्गावरून वाळूची वाहतूक करणारा डंपर (क्र. :- KA- 22- बी- 8379) चौके येथे पेट्रोल पंप नजीकच्या रस्त्यावर महसूल विभागाच्या पथकाने अडवला असता डंपर चालकाकडे वाळू ल वाहतूक पास आढळून आला नाही. तसेच या डंपर मध्ये दोन ब्रास वाळू सापडून आली. त्यामुळे विनापास वाळू वाहतूक प्रकरणी हा डंपर महसूल विभागाने ताब्यात घेऊन तो मालवण तहसील कार्यालय परिसरात ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी डंपर मालक महेश म्हाडदळकर (रा. कुडाळ) यांना दंडात्मक कारवाईबाबत मालवणचे तहसीलदार अजय पाटणे यांनी नोटीस बजावली आहे.
