विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून आमदार वैभव नाईक यांचा वाढदिवस साजरा…

मालवण ता.२६-: आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त मालवण तालुका शिवसेनेच्या वतीने विविध कार्यक्रम पार पडले. दुपारी मालवणात दाखल झालेल्या आमदार वैभव नाईक यांचा शिवसेना शाखा मालवण येथे बहुसंख्य शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांच्या उपस्थितीत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.

यावेळी उपस्थितांनी आम. नाईक यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. आम. वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेतर्फे आयोजित महा आरोग्य शिबिराचा शुभारंभ मालवण ग्रामीण रुग्णालय येथे करण्यात आला. या शिबिरात नेत्र तपासणी, हृदयरोग व रक्त तपासणी करण्यात आली. या शिबिराला गरजू रुग्णांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दुपारी आम. नाईक यांनी या शिबिरास भेट दिली. त्यानंतर शिवसेना शाखा येथे केक कापून आम. नाईक यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. तर सायंकाळी दैवज्ञ भवन येथे महिलांसाठी खेळ पैठणीचा हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमास देखील आम. नाईक यांनी भेट दिली. यावेळीही केक कापून आम. नाईक यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकारी व सहभागी महिलांनी आमदारांना शुभेच्छा दिल्या.

तसेच आम. नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त वायरी भूतनाथ विभाग व माधवबाग कणकवली यांच्या वतीने वायरी भूतनाथ शाळा येथे आरोग्य तपासणी शिबीर पार पडले. तर कट्टा येथे युवासेनेतर्फे डबलबारी भजन कार्यक्रम संपन्न झाला. तसेच शिवसेनेकडून मालवण शहरात प्रत्येक प्रभागात शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. तर ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना मोफत जेवण उपलब्ध करून देण्यात आले.

यावेळी माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, सुशांत नाईक, उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, बाबी जोगी, यतीन खोत, मंदार केणी, महेश जावकर, बाळू नाटेकर, मंदार ओरसकर, मनोज मोडकर, अमेय देसाई, बाळ महाभोज, पूनम चव्हाण, सेजल परब, तृप्ती मयेकर, दीपा शिंदे, श्‍वेता सावंत, शिल्पा खोत, अंजना सामंत, पूजा तोंडवळकर, सन्मेष परब, अरुण भोगले, आतू फर्नांडिस, मंदार गावडे, तपस्वी मयेकर, गौरव वेर्लेकर, स्वप्नील आचरेकर यांच्यासह अन्य पदाधिकारी व शिवसैनिक, महिला आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page