तर यंगस्टार कणकवली उपविजेता
मालवण दि प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशन यांच्या मान्यतेने मालवण तालुका कबड्डी फेडरेशन च्या सहकार्याने व नवतरुण मित्र मंडळ डांगमोडे आणि ग्रामस्थांच्या वतीने आयोजित मसुरे डांगमोडे येथील भवानी मातेच्या वार्षिक गोंधळ विधिनिमित्त जिल्हास्तरीय पुरुष कबड्डी सामन्यांमध्ये रेवतळे मालवण या संघाने चषकावर नाव कोरले तर उपविजेता म्हणून यंगस्टार कणकवली या संघाने चषकावर आपले नाव कोरले.
या सामन्यांमध्ये वेंगुर्ला संघाचा भक्तियेश साळगावकर याला अष्टपैलू खेळाडू म्हणून आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. तसेच अंतिम सामन्यामध्ये महापुरुष रेवतळे मालवण संघाच्या किर्तेश परब याने एकहाती पक्कड करीत सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. मसुरे डांगमोडे येथे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचा अंतिम सामना हा महापुरुष रेवतळे मालवण विरुद्ध यंगस्टार कणकवली या संघामध्ये झाला. शेवटचा सामना पाहण्यासाठी क्रीडा रसिक शेवटपर्यंत जागेवर खिळून बसले होते. हा सामना महापुरुष रेवतळे मालवण संघाने एकतर्फी विजय मिळवीत चषकावर नाव कोरले.
या संघास रोख रक्कम १० हजार व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले तर उपविजेत्या यंगस्टार कणकवली या संघास रोख रक्कम ५ हजार व चषक देऊन गौरविण्यात आले. तसेच जय महाराष्ट्र सावंतवाडी या संघाने तृतीय क्रमांक पटकावला तर जय मानसिश्वर संघास चतुर्थ क्रमांक पटकाविला या दोन्ही संघास रोख रक्कम २ हजार व आकर्षक चषक देण्यात आले. स्पर्धेतील उत्कृष्ट चढाई शिवलिंग पाटील (यंगस्टार कणकवली), उत्कृष्ट पक्कड किर्तेश परब (महापुरुष रेवतळे मालवण), अष्टपैलू खेळाडू भक्तियेश साळगावकर (जय मानसिश्वर वेंगुर्ला) यांना आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. अंतिम सामन्यामध्ये जतीन कांबळी, मिथिल हिंदळेकर, बंटी मांजरेकर यांनी चढाईची धुरा सांभाळत उत्तम खेळाचे प्रदर्शन दाखविले तसेच किर्तेश परब, मंदार आंबेरकर, ललित चव्हाण, उत्कर्ष मांजरेकर यांनी मोक्याच्याक्षणी उत्कृष्ट पक्कड करीत अंतिम सामन्यात यंगस्टार कणकवली या संघास धूळ चारली.
