आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त हडी येथे खाऊ वाटप

शालेय मुलांना दिले खाऊ

मालवण ता.२६-:* मालवण कुडाळचे आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त हडी गावातील शाळांमधील मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले. शिवसेना महिला मालवण उपतालुका प्रमुख सौ. पूजा तोंडवळकर यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला. मालवण कुडाळचे आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त मालवण तालुक्यात ठिकठिकाणी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हडी गावातील जि. प. शाळा नं ३ मधील मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले यावेळी उपस्थित मुलांबरोबरच शिक्षक व उपस्थितांनी आम. वैभव नाईक यांना उत्तम आरोग्य आणि यश लाभावे यासाठी प्रार्थना करण्यात आली.

यावेळी हडी शाखाप्रमुख राजा तोंडवळकर, हडी शाखाप्रमुख संतोष अंबरे, ग्रा. प. सदस्या सौरभी अंबरे, ग्रा. प. सदस्या प्राची मयेकर, शिवसेना शाखा संघटक दिव्या पाटकर, हडी शाळा नं. १ चे मुख्याध्यापक प्रभू सर , हडी शाळा नं. २ चे मुख्याध्यापिका श्रीमती कदम, शाळा नं ३ च्या मुख्याध्यापिका श्रीमती प्रभू आदी व इतर उपस्थित होते.

You cannot copy content of this page