मेढा येथे चौकचार मांड उत्सव उत्साहात साजरा

मालवण ता.२६-:* मालवण मेढा येथील चौकचार मांड येथे वार्षिक मांड उत्सव उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा झाला. यानिमित्त चौकचार मित्रमंडळाच्या वतीने पारंपारिक घुमट वादन व नृत्य तसेच सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले. मांड उत्सवानिमित्त चौकचार घुमटी फुलांनी व विद्युत रोषणाईने सजविण्यात आली होती. यावेळी सकाळपासून दिवसभर भाविकांनी उपस्थित राहून पूजा अर्चा करून नवस बोलले व फेडले. तसेच रात्री चौकचाराला सामूहिक गाऱ्हाणे घातल्यानंतर पारंपारिक घुमट वादन तसेच कलावंतीण नृत्य सादर झाले.

तर किल्ला रहिवासी हनुमंत वायंगणकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित गीते सादर केली. यास तबला- सुधीर गोसावी, हार्मोनियम – प्रफुल्ल गोसावी यांची संगीत साथ लाभली. त्यानंतर मनोज (लारा) मयेकर यांच्या ओंकारा ग्रुपचे रेकॉर्ड डान्स व मालवणी नाट्य असे सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाले. तसेच स्थानिक बालकलाकारांचे रेकॉर्ड डान्सही सादर झाले. या कार्यक्रमास रसिकांनी गर्दी केली होती. या उत्सवानिमित्त रविवार दि. २७ मार्च रोजी वाडवळ कार्यक्रम होणार आहे. यावेळी चौकचार मित्रमंडळाचे अध्यक्ष यशवंत मेतर, माजी नगरसेवक बाळू तारी, लक्ष्मण प्रभू, आपा मोरजकर, संतोष पराडकर, विनायक मोरजकर, अभय कदम, राजू वाघ, विनायक मेतर, अरुण आढाव, बाळा आढाव, शंकर पराडकर, अजित शेलटकर, उपेंद्र गावकर, भूषण मेतर, दीपक आढाव, नंदू वाघ, सर्वेश पराडकर, नितेश पेडणेकर आदी व इतर उपस्थित होते.

You cannot copy content of this page