‘वातावरणातील बदलाचे गांभीर्य’ याविषयी मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

मालवण ता.२६-:* गेल्या काही वर्षांत हवामानात झालेला बदल प्रकर्षांने जाणवत आहे. याचाच अभ्यास आणि कृती करण्यासाठी मालवण येथील मेगल डिसोझा हिने मालवण मधील युवक-युवतींना एकत्र येवून यूथ बीट फाॅर क्लायमेट या ग्रुपची स्थापना केली असून या ग्रुपच्या वतीने त्याच्या वतीने इंदिरा काॅम्प्लेक्स, धुरीवाडा मालवण येथे ‘वातावरणातील बदलाचे गांभीर्य’ या विषयी मार्गदर्शन कार्यशाळेचे संपन्न झाली.

यावेळी मेगल डिसोझा हिने पृथ्वीवरील वाढते कार्बनडाय आॅक्साइडचे प्रमाण, त्याचा पृथ्वीवर होणारा परिणाम सांगितला. तसेच समुद्र, हवा , जमिन यावर सातत्याने कार्बनडाय आॅक्साइडचा मारा होत असल्याने भविष्यात आॅक्सिजन मिळणे कमी होणार आहे याची जाणिव करुन दिली. यासाठी सामान्य माणूस काय करु शकतो याबाबत उपाय योजनांचा उहापोह यावेळी करण्यात आला. सदर ग्रुपच्या वतीने दर शुक्रवारी याप्रमाणे गेले २६ शुक्रवार किनारा स्वच्छता मोहीम राबवली जात आहे. यामध्येही सहभागी होण्याचे आवाहन मेगल डिसोझा हिने केले. कार्यशाळेस परिसरातील महिला उपस्थित होत्या. स्वाती पारकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

You cannot copy content of this page