अनेक वर्षांची आरोग्य समस्या मिटणार…
दोडामार्ग ता.२६-:* गेल्या अनेक वर्षांपासून दोडामार्ग तालुक्यातील जनतेला गोवा राज्यातील आरोग्य सुविधांवर अवलंबून राहावे लागत आहे.आता दोडामार्ग येथे उपजिल्हा रुग्णालयात मंजूर झाले आहे.
साटेली भेडशी येथील नवीन आरोग्य केंद्र इमारत बांधकाम पूर्ण झाले आहे.लवकरच लोकापर्ण सोहळा होणार आहे तेव्हा येथील रुग्णांना गोवा येथे किरकोळ आजार उपचार यासाठी गोवा येथे जाण्याची वेळ येऊ नये यासाठी आवश्यक सुविधा तंज्ञ डाॅक्टर कर्मचारी यांची नियुक्ती करावी अशी मागणी दोडामार्ग तालुका विकास मंडळ मुंबई अध्यक्ष तसेच कार्याध्यक्ष वासुदेव वर्णेकर यांनी केली आहे
