Headlines

सचिन गडेकर यांनी स्व: खर्चातून बुजवले आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याचे खड्डे…

वेंगुर्ला ता.२६-:* आडेली प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणा-या रस्त्यावरील खड्डे बांधकाम व्यावसायीक व आडेली येथील रहिवासी सचिन गडेकर यांनी स्वखर्चातून बुजविले.

आडेली-खुटवळवाडी ते झारापकडे जाणा-या मार्गावरील कौल कारखाना ते आडेली प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंतच्या मार्गावर खड्डे पडून दूरावस्था झाली होती. शासनाने दुर्लक्ष केल्याने निदान या रस्त्याची डागडुजी तरी व्हावी अशी मागणी ग्रामस्थांतून होत होती. सामाजिक कार्यकर्ते तथा ठेकेदार सचिन गडेकर यांनी स्वखर्चातून एक किलोमिटर भागातील खड्डे बुजविले. याबाबत स्थानिक ग्रामस्थ व वाहनधारकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

You cannot copy content of this page