विरोधी पक्षनेतेपदी अजित पवार यांची निवड झाल्याने अर्चना घारे परब यांनी घेतली सदिच्छा भेट
सिंधुदुर्ग वासीयांतर्फे दिल्या शुभेच्छा सावंतवाडी ता.०५-: महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विरोधी पक्षनेतेपदी घोषणा करण्यात आल्याने आज राष्ट्रवादीच्या कोकण विभागीय अध्यक्ष सौ. अर्चना घारे परब यांनी आज पवार यांची भेट घेतली. यावेळी घारे यांनी पवार यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना निवडीबद्दल शुभेच्छा दिल्या .
