राष्ट्रवादीच्या शुभेच्छा…भाजपचे सुधीर आडीवरेकर चांगलेच चर्चेत

वाढदिनी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष यांनी शुभेच्छा दिल्याने राजकीय चर्चेला उधाण

⚡सावंतवाडी ता.०४-: सावंतवाडीचे माजी आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर यांच्या वाढदिवसानिमित्त आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या आहेत. सावंतवाडी नगरपालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणुकामध्ये भाजपचे प्रबळ उमेदवार म्हणून सुधीर आडिवरेकर यांच्याकडे पाहिले जात असून, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेत शुभेच्छा दिल्याने शहरात चर्चा रंगू लागल्या आहेत. परंतु, ही भेट केवळ मैत्रीपूर्ण असल्याचे राष्ट्रवादिनी स्पष्ट केले आहे.

यावेळी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, शहर अध्यक्ष देवेंद्र टेमकर, हिदायत्तुला खान, बाबल्या दुभाषी,व आदी पदाधिकारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page