देवगड महाविद्यालयात ६ रोजी “नैसर्गिक शेती” कार्यशाळा

उन्नत भारत अभियान, कृषी विज्ञान केंद्र किर्लोसचा संयुक्त उपक्रम

देवगड (प्रतिनिधी)
देवगड महाविद्यालय ‘उन्नत भारत अभियान’ व कृषी विज्ञान केंद्र, किर्लोस , सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी सप्ताहानिमित्त दिनांक ६ जुलै २०२२ रोजी ठीक १० वाजता नैसर्गिक शेती या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यशाळेमध्ये नैसर्गिक शेती – संकल्पना व वाव, जमिनीचे आरोग्य व व्यवस्थापन, नैसर्गिक शेतीमध्ये देशी गाईंचे महत्त्व आणि जीवामृत तयार करण्याच्या पद्धती, नैसर्गिक कीटकांची निर्मिती व वापर या विषयांवर तज्ञांचे मार्गदर्शन होणार असून जीवामृत तयार करण्याच्या पद्धती यावर प्रात्यक्षिके करण्यात येतील. या कार्यशाळेचे औचित्य साधून देवगड महाविद्यालयाच्या “उन्नत भारत अभियान” या विभागामार्फत 2021- 22 मध्ये घेण्यात आलेल्या सेंद्रिय शेती स्पर्धेचा निकाल जाहीर करून विजेत्यांना बक्षिसे प्रदान करण्यात येणार आहेत.
तरी या कार्यशाळेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा.

You cannot copy content of this page