जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी व्यक्त केला विश्वास
⚡देवगड ता.०४-: शिवसेनेचे बंडखोर आमदार जे शिंदे गटात गेले आहेत ते जनतेच्या हितासाठी नसून स्वतःच्या फायद्यासाठी गेलेले आहेत.असे असले तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसैनिक बरोबर देवगड तालुक्यातील हे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठाम आहे.आणि या सर्व शिवसैनिकांच्या जोरावर या पुढील काळात सिंधुदुर्ग जिल्ह्याबरोबर देवगड तालुक्यात उभारी घेणार आहे.असा ठाम आत्मविश्वास शिवसेना नेते माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी देवगड येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केला.
यावेळी.शिवसेना नेते संदेश पारकर, सतीश सावंत यांच्या उपस्थितीत पार पडली .या सभेला शिवसेना तालुका प्रमुख विलास साळसकर,मिलिंद साटम,माजी सभापती रवींद्र जोगल,उपतालुका प्रमुख निवृत्ती (बुवा )तारी, नगराध्यक्षा साक्षी प्रभू,गटनेते संतोष तारी युवा प्रमुख निनाद देशपांडे व शिवसेना नगरसेवक नगरसेविका उपस्थित होते.
देवगड तालुका शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक यांची महत्वपूर्ण सभा जामसंडे येथे सांस्कृतिक भवनात आयोजित करण्यात आली होती.यावेळी ते बोलत होते.या पुढे बोलताना
श्री सावंत म्हणाले,
शिवसेनेतून गद्दारी करून जे बंडखोर बाहेर पडले त्यांचा निषेध देवगड तालुका बैठकीत करण्यात आला.त्याचबरोबर आम.वैभव नाईक हे मूळ शिवसेनेसोबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली संघटना जोमाने वाढवीत आहेत.त्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठराव घेण्यात आल्याचे सांगून,भाजप सोबत गेलेल्या आमदारांवर जनतेचा रोष व मनात चीड आहे.त्यामुळे येथील सर्व शिवसैनिकांनी संघीकपणे काम करून संघटित पणे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या पाठीशी उभे रहाण्याचा निर्धार या सभेत केल्याचा श्री सावंत यांनी स्पष्ट केले.अतिवृष्टी पाऊस असतानाही देवगड तालुक्यातील पदाधिकारी,शिवसैनिक यांची उपस्थिती ही शिवसेनेला उभारी देणारी आहे.असे त्यांनी आवर्जून सांगितले.
विलास साळसकर
या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने बोलताना तालुकाप्रमुख विलास साळसकर म्हणाले,
राष्ट्रवादी मधून शिवसेनेत आलेले माजी पालकमंत्री दीपक केसरकर याना शिवसेनेने आमदार की देऊन मंत्री बनविले.ते आता शिंदे गटाचे प्रवक्ते बनून हिंदुत्व शिकवीत आहेत.त्यांनी जिल्ह्यात येऊन शाखा सुरु करावी व मगच हिंदुत्व शिकवावे.त्यांनी सावंतवाडी,दोडामार्ग, वेंगुर्ले येथील जनतेने शिवसैनिकांनी त्यांना निवडून दिले त्यांच्या मतांचा मान त्यांनी राखला नाही त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा. अशी मागणी केली.
येत्या २७ जुलै रोजी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान व आरोग्य शिबिराचे आयोजन देवगड येथे करण्यात येणार आहे.
तसेच श्री देव कुणकेश्वर येथे अभिषेक करण्यात येईल असे सांगून देवगड जामसंडे नगरपंचायत करीता ५० लाखाचा निधी यापूर्वीच्या शासनाने दिला असून त्यात ३० लाख रु अद्ययावत व्यायाम शाळा,
जामसंडे येथे तसेच जामसंडे व मळई येथील स्मशानभूमी करीता प्रत्येकी रु १० लाखाचा निधी प्राप्त होणार आहे.
देवगड
जामसंडे नळपाणी योजनेला निधीची आर्थिक तरतूदही करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
