चिरे, वाळू दिली उपलब्ध करून
⚡सावंतवाडी ता.०४-: शहरातील कोळेकर कुटुंबाचे घर उभारण्यासाठी सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी शहरातील दानशूर व्यक्तीनी सहकार्य करावे असे आवाहन केले होते. या आव्हानाला काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी आणि पदाधिकारी बबन डिसोजा यांनी साद दिली असून, चिरे आणि वाळू देऊन सहकार्य केले आहे. त्यामुळे कोळेकर कुटुंबियांनी आभार व्यक्त केले आहेत.
