Headlines

खारेपाटण मधील पूरस्थितीचा घेतला आढावा

आरोग्य विभाग, वीज वितरण अधिकाऱ्यांना दिल्या सूचना ⚡कणकवली ता.०५-: दिवसभरात कणकवली तालुक्यात 115 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे गेले दोन दिवस मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे खारेपाटणमध्ये पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली असून, या स्थितीचा आढावा कणकवली प्रांताधिकारी वैशाली राजमाने व तहसीलदार आर. जे. पवार यांनी भेट देत घेतला. तसेच नागरिकांनी पुरस्थिती निर्माण झाल्यास सुरक्षित स्थळी थांबण्याच्या सूचनाही…

Read More

बांदा शहरात पुर स्थितीबाबत प्रशासनाने अलर्ट राहावे

भाजप आ नितेश राणे, आशिष शेलार यांच्या प्रशासनाला सूचना बांदा ता.०५-:बांदा शहर व परिसर हा पूरग्रस्त असल्याने शहरात प्रशासनाने स्थानिकांच्या मदतीने २४ तास अलर्ट राहणे गरजेचे आहे . पुरस्थिती उद्भवल्यास प्रसंगी स्थानिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करावी. यासाठी आपत्ती व्यवस्थापनची टीम याठिकाणी कार्यरत ठेवावी तसेच रेस्कयू साठी अतिरिक्त साहित्य लागल्यास तात्काळ उपलब्ध करा अशा…

Read More

वायंगणी स्वामी समर्थ मठात १३ रोजी कार्यक्रम

⚡मालवण ता.०५-: गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त वायंगणी येथील स्वामी समर्थ मठात १३ जुलै रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पहाटे ५ वा. मंगलस्नान दुग्धाभिषेक व पूजाविधी, सकाळी ७ वा. नित्य आरती, ८ ते १० या वेळेत अभिषेक पारायण, १० ते ११ वा. धार्मिक विधी, १२ वा. महाआरती, १२ ते १.३० वा. महाप्रसाद, दुपारी १ ते ६…

Read More

मायनिंगची माती घुसली शेतात

कोंडुरा येथील शेतकऱ्याचे नुकसान : विहीर कोसळल्याने आर्थिक बाजू कोलमडली ⚡सावंतवाडी ता.०५-: सावंतवाडी तालुक्यात सलग दोन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसाचा फटका मळेवाड-कोंडुरा येथील शेतकरी भाऊ मडुरकर व अर्जुन मुळीक, अशोक मुळीक यांना बसला. चुकीच्या पध्दतीने डम्प करून ठेवलेली मायनिंगची माती आज शेतकऱ्यांसाठी नुकसानीची ठरली. चिखल माती पाण्यासह शेतात घुसल्याने भातशेतीचे नुकसान होणार आहे. तसेच…

Read More

सोनुर्ली हायस्कूलमध्ये गुणवंत विद्यार्थांचा सत्कार सोहळा संपन्न…

⚡सावंतवाडी ता.०५सहदेव राऊळ- : माऊली माध्यमिक विद्यालय सोनुर्ली प्रशालेत दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ श्री देवी माऊली शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अनंत परब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. गेली दोन वर्षे कोरोना महामारीमुळे सत्कार सोहळ्याचे आयोजन करता न आल्याने शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च 2020, मार्च 2021 व मार्च 2022 या तिन्ही शैक्षणिक वर्षांमधील प्रशालेतून प्रथम तीन…

Read More

राज्य सरकारी कर्मचारी सहकारी पतसंस्था निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न

8 जुलै रोजी ओरोस येथे बैठकीचे आयोजन ⚡कणकवली ता.०५-: सिंधुदुर्ग जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी सहकारीपतसंस्थेच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक 24 जुलै रोजी होऊ घातली आहे. सदरील निवडणुकीसाठी 15 जागांसाठी 33 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. असे असले तरीही यापूर्वी सन 2015 मध्ये पतसंस्थेचे माजी चेअरमन चंद्रशेखर उपरकर व सखाराम सपकाळ यांचेसह कांही आजीमाजी संचालकानी उमेदवारी…

Read More

छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचा चरित्रग्रंथ हाच आमचा धर्मग्रंथ:प्राचार्य राजेंद्रकुमार चौगुले

⚡कणकवली ता.०५-:छत्रपती राजर्षी शाहू महाराज हे बहुजन समाजाचे महानायक ,शेतकऱ्यांचे उद्धारकर्ते,विशाल मनाचे राजे व एक लोकनेते होते.त्यांनी तळागाळातील बहुजन वर्गास समाजातील मुख्य प्रवाहात आणले.त्यांचे विचार आजही दिशादर्शक आहेत.समाजात समानता प्रस्थापित करायची असेल तर आधी जातीभेदाचे निर्मुलन होणे गरजेचे आहे. छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचा चरित्रग्रंथ हाच आमच्यासाठी धर्मग्रंथ आहे.असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. राजेंद्रकुमार चौगुले यांनी…

Read More

जिल्ह्यातील पर्जन्यमान व पाणीसाठा

⚡सिंधुदुर्गनगरी ता.०५-: तिलारी-आंतरराज्य प्रकल्पाच्या क्षेत्रात सध्या या प्रकल्पामध्ये 272.666 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 60.95 टक्के भरले आहे. मध्यम पाटबंधारे प्रकल्प – देवघर-38.6170, अरुणा -2.8133, कोर्ले- सातंडी -25.4740 लघु पाटबंधारे प्रकल्पातील साठा पुढीलप्रमाणे- शिवडाव-1.509,नाधवडे-1.100,ओटाव-0.225, देंदोनवाडी – 0.546, तरंदळे -1.500, आडेली-0.658, आंबोली – 1.558, चोरगेवाडी– 1.360, हातेरी-1.963, माडखोल -1.690, निळेली -1.747, ओरोस बुद्रुक-0.786, सनमटेंब-1.685, तळेवाडी- डिगस-0.647, दाभाचीवाडी-1.076,…

Read More

जिल्ह्यात अतिवृष्टी

वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 240.3 मि.मी. पाऊस ⚡सिंधुदुर्गनगरी ता.०५-: जिल्ह्यात गेल्या चौवीस तासात वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 240.3 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 155.0 मि.मी. पाऊस झाला असून एकूण सरासरी 1103.9 मि.मी. पाऊस झाला आहे. देवगड वगळता सर्वच तालुक्यात पावसाने शतक पार केले आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून…

Read More

मुसळधार पावसामुळे तळवडे बाजारपेठेत पुराचे पाणी

⚡सावंतवाडी ता.०५सहदेव राऊळ-: काल सोमवारपासून पडलेल्या आज सकाळपासून पुन्हा जोर धरला आहे. या मुसळधार पावसामुळे तळवडे बाजारपेठेत पुराचे पाणी घुसले आहे. तळवडे बाजारपेठेचे होणारे विस्तारीकरण तसेच बाजारपेठेत वाढते बांधकाम याचा फटका पूर्णपणे बसला आहे. बाजारपेठेतून पाणी जाण्याचा मार्ग बंद काही ठिकाणी बंद झाल्याने पाऊस पडल्यावर लगेच पाणी बाजारपेठेत घुसत आहे. यावर प्रशासनाने तात्काळ बंदोबस्त करावा,…

Read More
You cannot copy content of this page