सोनुर्ली हायस्कूलमध्ये गुणवंत विद्यार्थांचा सत्कार सोहळा संपन्न…

⚡सावंतवाडी ता.०५सहदेव राऊळ- : माऊली माध्यमिक विद्यालय सोनुर्ली प्रशालेत दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ श्री देवी माऊली शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अनंत परब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.

गेली दोन वर्षे कोरोना महामारीमुळे सत्कार सोहळ्याचे आयोजन करता न आल्याने शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च 2020, मार्च 2021 व मार्च 2022 या तिन्ही शैक्षणिक वर्षांमधील प्रशालेतून प्रथम तीन गुणानुक्रमांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला.तसेच यावेळी निरवडे गावचे सरपंच हरी वारंग यांचा त्यांच्या विशेष कार्याबद्दल संस्थेच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या गुणगौरव सोहळ्यास संस्थेचे अध्यक्ष अनंत परब, संस्था उपाध्यक्ष रामा जाधव, संस्था सचिव नागेश गावकर, सहसचिव गोविंद धडाम, बापू मोर्ये, सोनुर्ली सरपंच गुंजन हिराप, ग्रामपंचायत सदस्या लक्ष्मी पालयेकर, उमेश सावंत, शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष विकास जेठे,प्रशालेचे मुख्याध्यापक जी. एस. मोर्ये, एन. जे. गवंडळकर, पी. जी. काकतकर, पी. एम. सावंत, शशिकांत गवंडे, कृष्णा गावडे, महेश सावंत, विनोद ठाकूर, विष्णू नाईक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक वर्ग व माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जीवनात यशस्वी होण्यासाठी कष्टाला पर्याय नाही कष्टातून घेतलेल्या शिक्षणाची पाळेमुळे खोलवर जातात कष्ट करून जिद्दीने ज्यांनी शिक्षण घेतलं ती मुले शिक्षण क्षेत्रात पुढे गेलेली आहेत कष्ट करण्याची सवय ठेवा. कष्टातून चांगला अनुभव मिळतो. आपल्या जीवनातील स्वप्नांना कष्टाच बळ द्या आणि आपलं पुढील आयुष्य उज्वल बनवा. करिअरच्या नवनवीन वाटा शोधा आणि सतत नाविन्याचा ध्यास घ्या.” असे आवाहन निरवडे गावचे सरपंच हरी वारंग यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना श्री. पांडुरंग काकतकर यांनी दहावी बारावी नंतरच्या करिअरच्या संधी याबद्दल उपस्थित विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ यांना मार्गदर्शन केले. तसेच पी. एम. सावंत यांनी विद्यार्थ्यांची पुढील दिशा ठरविण्याची जबाबदारी संस्था, शिक्षक, विद्यार्थी व पालक या चौघांचीही आहे. शैक्षणिक क्षेत्रात पुढील प्रवेशाची प्रक्रिया समजून घ्या, प्रत्येक क्षेत्रात संधी आहे ती शोधता आली पाहिजे. मोबाईल मधील इंटरनेटचा वापर शैक्षणिक प्रगतीसाठी करा व आपल्यातील आत्मविश्वास जागृत करून कष्ट करा असे सांगितले.

तिन्ही वर्षी नेहमीप्रमाणेच प्रशालेचा दहावीचा निकाल १००% लागला. यावेळी कुमारी. प्राची दामोदर पालेकर (९२.६०%), कुमारी- प्रिती महादेव गावडे(९०.२०%), कुमारी – संचिता पांडुरंग निर्गुण (८९.२०%) , कुमारी नूतन नंदकिशोर गावकर (९५.४०%), कुमार- लाडू न्यानेश्वर मसुरकर (९३.८०%), कुमारी सोनाली सिताराम पालेकर (९२.४०%), कुमारी- स्नेहल रवींद्र गावडे(८७.६०%), कुमारी- अपर्णा शशिकांत गवंडे (८५.२०%), कुमारी- प्रिया दशरथ गावकर (८४.२०%) या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना रोख पारितोषिके देण्यात आली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप सावंत यांनी तर आभार प्रदर्शन श्री पांडुरंग काकतकर सर यांनी केले.

You cannot copy content of this page