राज्य सरकारी कर्मचारी सहकारी पतसंस्था निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न

8 जुलै रोजी ओरोस येथे बैठकीचे आयोजन

⚡कणकवली ता.०५-: सिंधुदुर्ग जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी सहकारीपतसंस्थेच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक 24 जुलै रोजी होऊ घातली आहे.

सदरील निवडणुकीसाठी 15 जागांसाठी 33 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. असे असले तरीही यापूर्वी सन 2015 मध्ये पतसंस्थेचे माजी चेअरमन चंद्रशेखर उपरकर व सखाराम सपकाळ यांचेसह कांही आजीमाजी संचालकानी उमेदवारी दाखल केलेल्या उमेदवाराना एकत्र आणून पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध करून एक चांगला पायंडा पाडला होता. त्यामुळे पतसंस्थेचा सुमारे 3 ते 4 लाख रुपये खर्च वाचवण्यात यश मिळाले होते. तसेच विद्यमान संचालक व विरोधक यांच्यातील पुढील 5 वर्षातील हेवेदावे दूर करण्यातही यश आले होते.

म्हणून यावर्षी सुद्धा हि निवडणुक न होता ती बिनविरोध व्हावी यासाठी शुक्रवार दिनांक 8 जुलै रोजी सकाळी 11वाजता ओरोस येथील राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या सर्व उमेदवारांची एकत्रित बैठक आयोजित करण्यात आलेली असून फक्त उमेदवारानीच बैठकीस उपस्थित रहावे असे आवाहन पतसंस्थेचे माजी चेअरमन चंद्रशेखर उपरकर व माजी चेअरमन सखाराम सपकाळ यांनी केले आहे.

You cannot copy content of this page