मुसळधार पावसामुळे तळवडे बाजारपेठेत पुराचे पाणी

⚡सावंतवाडी ता.०५सहदेव राऊळ-: काल सोमवारपासून पडलेल्या आज सकाळपासून पुन्हा जोर धरला आहे. या मुसळधार पावसामुळे तळवडे बाजारपेठेत पुराचे पाणी घुसले आहे. तळवडे बाजारपेठेचे होणारे विस्तारीकरण तसेच बाजारपेठेत वाढते बांधकाम याचा फटका पूर्णपणे बसला आहे. बाजारपेठेतून पाणी जाण्याचा मार्ग बंद काही ठिकाणी बंद झाल्याने पाऊस पडल्यावर लगेच पाणी बाजारपेठेत घुसत आहे. यावर प्रशासनाने तात्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

सावंतवाडी वेंगुर्ला मार्ग वाहतूक सुद्धा पूर्णपणे बंद झाली आहे. सावंतवाडी वेंगुर्ला तुळस मार्ग हा पूर्णपणे या पुराचे पाणी पुलावर आल्यामुळे वाहतूकसाठी ठप्प झाला. पावसामुळे दुकानदारांच्या काही दुकानात पाणी घुसल्याने मोठ्या प्रमाणात दुकानातील सामानाचे नुकसान झाले आहे. सावंतवाडी महसूल प्रशासन याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे. या पुराच्या पाण्याचे योग्य नियोजन करण्याकडे हे प्रशासन पूर्णपणे अकार्यक्षम ठरत आहे, सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या दुतर्फ असलेली गटार साफ न केल्यामुळे हे पाणी पूर्णपणे रस्त्यावर येत आहे बाजारपेठेत नजीक असणाऱ्या ओढ्याचा व पाण्याचा मार्ग काही ठिकाणी अरुंद झाल्याने पाणी रस्त्यावरुन वाहत आहे, यावर योग्य उपाय योजना करणे गरजेचे आहे.ग्रामपंचायत प्रशासन व तालुका प्रशासन याकडे लक्ष देऊन यावर योग्य मार्ग काढणे गरजेचे बनले आहे.

You cannot copy content of this page