नरडवे रस्त्यावर झाड पडून वाहतूक ठप्प

⚡कणकवली ता.०५-: नरडवे रोडवर मंगळवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास झाड पडल्याने दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती. नरडवे रोडवर सांगवे हवामान केंद्राजवळ हे झाड पडल्याने वाहतूक ठप्प झाली. काल देखील या रस्त्यावर झाड पडल्याने वाहतुकीच विस्कळीत झाली होती. त्यामुळे दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. दरम्यान याबाबत भाजपा पदाधिकारी सुरेश सावंत यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाशी संपर्क साधला असून तातडीने कर्मचारी पाठवण्याची मागणी यांनी केली .

You cannot copy content of this page