खारेपाटण मधील पूरस्थितीचा घेतला आढावा

आरोग्य विभाग, वीज वितरण अधिकाऱ्यांना दिल्या सूचना

⚡कणकवली ता.०५-: दिवसभरात कणकवली तालुक्यात 115 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे गेले दोन दिवस मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे खारेपाटणमध्ये पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली असून, या स्थितीचा आढावा कणकवली प्रांताधिकारी वैशाली राजमाने व तहसीलदार आर. जे. पवार यांनी भेट देत घेतला. तसेच नागरिकांनी पुरस्थिती निर्माण झाल्यास सुरक्षित स्थळी थांबण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या.

यावेळी खारेपाटण सरपंच रमाकांत राऊत, मंडळ अधिकारी संतोष नागावकर, तलाठी यु वाय शिंगनाथ, चव्हाण, कृषी सहायक प्रवीण भागवत, आरोग्य सुपरवायझर मर्ढेकर, एम एस ई बी चे अधिकारी, कोतवाल प्रथमेश गुरसाळे, महसूल कर्मचारी अरुण जोगळे आदी उपस्थित होते. पुराचे पाणी ज्या ठिकाणी साचलेले होते अशा भागात औषध फवारणीच्या सूचना आरोग्य विभागाला देण्यात आल्या. तसेच वीज वितरण च्या अधिकाऱ्यांना देखील पूरस्थितीच्या वेळी खबरदारी घेत आवश्यकता भासल्यास विद्युत पुरवठा खंडित करण्याच्या ही सूचना दिल्या.
कणकवली तालुक्यात काल दिवस भरत 115 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. काल रात्री पासून सतत पाऊस सुरू आहे.त्यामुळे कणकवलीत पूरर्जन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते. खारेपाटण गावामध्ये काही ठिकाणी पाणी घुसले होते. तसेच तळेरे वैभववाडी रस्त्याला सकाळी झाडे उंबळून पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. यासंबंधी कणकवली प्रांताधिकारी वैशाली राजमाने व तहसीलदार आर. जे. पवार यांनी प्रशासनाला सतर्कतेचे आदेश दिले असून प्रांत अधिकारी वैशाली राजमाने यांनी खारेपाटण गावात जाऊन पुरुजन्य परिस्थितीची पाहणी केली व नागरिकांना आपत्कालीन कक्ष न.02367232025 ला संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

You cannot copy content of this page