वायंगणी स्वामी समर्थ मठात १३ रोजी कार्यक्रम

⚡मालवण ता.०५-: गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त वायंगणी येथील स्वामी समर्थ मठात १३ जुलै रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पहाटे ५ वा. मंगलस्नान दुग्धाभिषेक व पूजाविधी, सकाळी ७ वा. नित्य आरती, ८ ते १० या वेळेत अभिषेक पारायण, १० ते ११ वा. धार्मिक विधी, १२ वा. महाआरती, १२ ते १.३० वा. महाप्रसाद, दुपारी १ ते ६ पर्यंत भक्तिरंग कार्यक्रम होणार आहे.

गुरुदिक्षा हा कार्यक्रम सकाळी ९ ते ११ या वेळेत होणार असून ज्या भक्तांना अन्नदान सेवेत सहभागी व्हायचे असेल, त्यांनी (८००७५५३८७१) या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page