चेंबर ऑफ कॉमर्स-शासन समन्वयक समितीच्या सदस्यपदी विजय केनवडेकर…

⚡मालवण ता.०४-: महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स मध्ये कोकणातील उद्योजकांचे प्रश्न व त्यासंबंधी प्रश्न सोडवण्यासाठी विशेष प्रयत्न करणारे विजय केनवडेकर यांची महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स व शासन यांच्या समन्वयक समितीवर सदस्य म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या महाराष्ट्राच्या पर्यटन समितीचे अध्यक्षपद केनवडेकर यांनी भूषविले असून व्यावसायिक पर्यटन परिषद सिंधुदुर्गात घेऊन यशस्वी केली होती. चेंबरची गव्हर्नर कॉन्सीलची सभा सिंधुदुर्गात घेऊन महाराष्ट्रातील उद्योजकांचे लक्ष सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे वेधले होते. चेंबरची दिल्ली येथे होणारी केंद्रीय मंत्री व खासदारांसमवेत होणारी गव्हर्नर कौन्सिल मिटिंग माजी अध्यक्ष शंतनू भडकमकर व संतोष मंडलेजा यांच्या नेतृत्वाखाली माजी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या सहकार्याने दिल्ली येथे सभा यशस्वी करण्यात विजय केनवडेकर यांनी विशेष प्रयत्न केले होते. चेबरच्या सर्व उपक्रमात भाग घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्याचा वेगळा ठसा उमटवण्याचा वेळोवेळी केनवडेकर यांनी प्रयत्न केला आहे.
लघु, सूक्ष्म, मध्यम उद्योगातील केंद्र सरकारमधील असणाऱ्या विविध योजना व्यापारी उद्योजकांमध्ये पोहोचवण्याचे काम व दलित चेंबर ऑफ कॉमर्स मार्फत वंचित समाजातील उद्योजकांसाठी असणाऱ्या वेगवेगळ्या योजना कोकणात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या सहकार्याने कोकणात वेगवेगळे उद्योगांना चालना देणारे व त्याचा फायदा सर्व उद्योजकांना होण्यासाठी विशेष प्रयत्न केनवडेकर करत आहेत. याच कामाची दखल घेऊन महाराष्ट चेंबर ऑफ कॉमर्स अध्यक्ष ललित गांधी यांनी विजय केनवडेकर यांची महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या समितीवर विशेष नेमणूक केली आहे.

You cannot copy content of this page