मनसेचे युवा नेते अमित ठाकरे पक्ष
संघटनेला उभारी देणार

परशुराम उपरकर :5 ते 7 जुलैपर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध कार्यक्रम

⚡कणकवली ता.०४-: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे हे सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. 5 ते 7 जुलैपासून सावंतवाडी येथून या दौऱ्याला सुरुवात होणार असून यावेळी तीनही विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन चर्चा केली जाणार असल्याची माहिती मनसेचे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी दिली आहे. या दौऱ्यामध्ये विद्यार्थी संघटना मजबूत करणे, मनसेच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधने तसेच विविध कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन पक्ष संघटनावाढी संदर्भात विचार विनिमय केला जाणार आहे असे माजी आम.परशुराम उपरकर यांनी सांगितले.

कणकवली येथे मनसे संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत मनसेचे सरचिटणीस माजी आम.परशुराम उपरकर बोलत होते.
अमित ठाकरे यांचे सावंतवाडी शहरांमध्ये 5 जुलैला सकाळी 11 वाजता आगमन होणार असून यावेळी शहरातील मँगो हॉटेलमध्ये पदाधिकार्‍यांच्या बैठका होणार आहे.

सावंतवाडी मतदारसंघातील तिन्ही तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची चर्चा तसेच विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांची चर्चा होणार आहे त्यानंतर दुपारी 3 वा.सावंतवाडी राजवाडा येथे भेट तसेच पाटेश्वर मंदिरामध्ये दर्शन 3.30 वाजता बांदेकर कॉलेज येथे विद्यार्थ्यांशी संवाद तसेच 4.30 च्या सुमारास सावंतवाडीच्या लाकडी खेळणी बाजारामध्ये भेट देऊन तेथील उत्पादकांशी चर्चा त्यानंतर सायंकाळी 5 वाजता कुडाळ एमआयडीसी येथे मुक्काम. त्यानंतर 6 जुलैला सकाळी 10 वाजता एमआयडीसी येथे जिल्हा पत्रकार संघाच्या कार्यकारणीचा सत्कार आणि पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. मराठा मंडळ कुडाळ येथे कुडाळ मालवण मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी 10.30 वाजता संवाद साधणार आहे त्यानंतर दुपारी 12 वाजता जिल्ह्यातील ठाकर समाज आणि राष्ट्रपती पुरस्कार विजेत्यांचा सत्कार केला जाणार आहे कणकवली तालुक्यामध्ये दुपारी 2.30 वा भगवती मंगल कार्यालयात कणकवली मतदारसंघातील कार्यकर्त्यांची बैठक आणि चर्चा तसेच विविध वृत्तपत्रांच्या आवृत्तीप्रमुख आणि सोशल मीडिया प्रमुखांची चर्चा केली जाणार आहे त्यानंतर सायंकाळी 5 वाजता मसुरे आंगणेवाडी येथे भराडी देवीचे दर्शन तेथून मालवण शहरातील मनसे कार्यकर्त्यांची चर्चा आणि देवबागला मुक्काम त्यानंतर 7 जुलैला कुणकेश्वर मंदिरात दर्शन घेऊन थेट रत्नागिरीकडे रवाना होणार असल्याचे परशुराम उपरकर म्हणाले यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांबरोबर मनसे संघटना वाढवण्याच्या दृष्टिकोनातून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ते रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहे हा दौरा 11 जुलै पर्यंत कोकणात आहे असे परशुराम उपरकर म्हणाले.

You cannot copy content of this page