⚡बांदा ता.०४-: मंगेश रघुनाथ कामत चँरिटेबल ट्रस्ट मुंबई संचलित व्ही. एन.नाबर मेमोरिअल इंग्लिश मिडियम स्कुल, बांदा येथे मेलेरिया I.E. आरोग्यवर्धिनी केंद्र बांदा नं .१ यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या मलेरिया आजाराबाबत उपाय योजना व जनजागृतीसाठी चित्रकला स्पर्धेत नाबर प्रशाळेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले.
या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. त्यामध्ये प्रथम क्रमांक कु.शुभम हनुमंत शिरोडकर, व्दितीय क्रमांक फाल्गुन महादेव नाईक, तुतिय क्रमांक अमृत तुळशीदास पेंडुरकर ,चतुर्थ क्रमांक हेरंब नितीन राणे यांनी यश मिळवले. स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांना नुकतेच बक्षिस वितरण करण्यात आले. आरोग्यवर्धक केंद्र नं.१ च्या डाँ.आरती देसाई यांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिस वितरण करण्यात आले. यावेळी आरोग्य सेवक दिपेश मेजारी,आरोग्य सेविका अनुज्ञा नाईक, अशंकालीन स्त्री परिचर वनिता धुरी, आशासेविका सावली कामत , सुधा बांदेकर, मुख्याध्यापिका सौ. मनाली देसाई, कला शिक्षक हर्षद खडपकर उपस्थित होते.
