Headlines

माजी आमदार शंकरभाई कांबळी यांनी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांची घेतली भेट

भेटीमुळे शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघणार असून चर्चेला उधाण ⚡सावंतवाडी ता.१०-: शिवसेनेचे माजी आमदार शंकरभाई कांबळी यांनी गुरुकुल येथे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांची घेतली भेट घेतली.परंतु या भेटीमुळे शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघणार असून चर्चेला उधाण आले आहे. या भेटीदरम्यान पूर्वाश्रमीचे आक्रमक शिवसैनिक तसेच शिवसेनेचे माजी नगरसेवक उमेश कोरगावकर, माजी नगरसेवक सुरेश भोगटे, माजी…

Read More

कणकवली कॉलेजचे प्रा. अनिल फराकटे यांचे अनोखे दातृत्व

स्वच्छता कर्मचाऱ्यांना प्रत्येकी १ हजार रुपये देत केला गौरव, ⚡कणकवली ता.१०-: कणकवली कॉलेजमध्ये मागील अनेक वर्ष प्राध्यापक म्हणून कार्यरत असणारे प्रा. अनिल फराकटे यांनी आपल्या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने अनोखी संकल्पना राबवली. केवळ कागदावरची संकल्पना न राबवता प्रत्यक्ष फिल्डवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्याची भूमिका प्रा. फराकटे यांनी घेतली. कणकवली शहर स्वच्छ ठेवण्यासाठी काम करणाऱ्या नगरपंचायतच्या ८१…

Read More

महिला काथ्या कॉयर क्लस्टरच्या मशिनरीचा शुभारंभ

⚡वेंगुर्ला ता.१०-: महिला काथ्या कामगार औद्योगिक सहकारी संस्थेच्या आवारांत महिलांच्या तसेच नारळ उत्पादक शेतक-यांच्या उन्नतीच्या दृष्टीने साकारलेल्या महिला काथ्या कॉयर क्लस्टरची संपूर्ण मशिन जोडणी झाली असून उत्पादन सुरु करण्यासाठी सज्ज झालेल्या मशिनरीच्या बॉयलर प्रज्वलित करण्याचा शुभारंभ महिला काथ्या क्लस्टरचे चेअरमन एम.के. गावडे यांच्या हस्ते वेंगुर्ला – कॅम्प येथे पार पडला.

Read More

रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊनच्या अध्यक्षपदी सुनील रेडकर तर सचिवपदी पंकज शिरसाट यांची निवड

⚡वेंगुर्ला ता.१०-: सन २०२२-२३ या रोटरी वर्षासाठी रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊनच्या अध्यक्षपदी सुनील रेडकर यांची, उपाध्यक्षपदी शंकर उर्फ राजू वजराटकर, सचिवपदी पंकज शिरसाट व खजिनदार म्हणून नितीन कुलकर्णी यांची निवड करण्यात आली आहे.

Read More

तिलारी प्रकल्पात 83.62 टक्के पाणीसाठा

⚡सिंधुदुर्गनगरी ता.१०-: तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामधून एकूण 5 हजार 514.327 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. सध्या या प्रकल्पामध्ये 374.105 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 83.62 टक्के भरले आहे. या धरणाच्या पालणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासात 82.50 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

Read More

दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक 94.00 मि.मी. पाऊस

⚡सिंधुदुर्गनगरी ता.१०-: गेल्या चौवीस तासात दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक 94.00 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 43.7 मि.मी. पाऊस झाला आहे. तर एकूण सरासरी 1525.2 मि.मी. पाऊस झाला आहे.

Read More

गरजू महिलांना प्रत्येकी दहा हजारांची मदत

सामंत ट्रस्टची सामाजिक बांधिलकी ⚡सावंतवाडी ता.१०-: येथील कै.डॉ.भाऊसाहेब परुळेकर नर्सिंग होम येथे दोन गरजू निराधार महिलांना सामंत ट्रस्ट मुंबई तर्फे प्रत्येकी दहा हजार रुपयांचे धनादेश प्रदान करण्यात आले. कोलगांव येथील लक्ष्मी दळवी या ७० वर्षांच्या दारिद्रय रेषेखालील निराधार आणि मधुमेह, उच्च रक्तदाब आजार असलेल्या आजीला आणि माणगाव येथील माधवी कुंभार या दारिद्रय रेषेखालील निराधार मातेला…

Read More

संस्थान कालीन विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशी साजरी

व्यापारी प्रसाद मुंज यांना मिळाला पूजेचा मान ⚡सावंतवाडी,ता.१०-: येथील संस्थानकालीन विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशी भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. यनिमित्त मंदिरात विविध धार्मिक विधी पार पडले. यावर्षी पूजेचा मान व्यापारी प्रसाद मुंज यांना देण्यात आला. शहरासह परिसरातील सर्व भाविकांनी मोठ्या उत्साहाने श्रीचे दर्शन घेतले. दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांची वर्दळ सुरु झाली होती. विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन…

Read More

स्विफ्ट कारचा मोती तलावकाठी अपघात…

⚡सावंतवाडी ता.१०-: कारवरील ताबा सुटून स्विफ्ट कार थेट मोती तलावाच्या कठड्यावर चढत लोटस लॅम्प च्या पोलाला धडकली.हा अपघात आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडला. यात कारचे मोठे नुकसान झाले असून घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.

Read More

सावंतवाडी येथील क्राऊन बेकरीचे मालक स्टीफन डिसोजा यांचे निधन

⚡सावंतवाडी ता.०९-: मच्छी मार्केट येथील क्राऊन बेकरीचे मालक स्टीफन साल्वादोर डिसोजा (72) यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले. गेले काही दिवसापासून ते आजारी होते. गोवा येथे खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. उद्या रविवारी सायंकाळी चार वाजता अंत्यविधी होणार आहे.

Read More
You cannot copy content of this page