संस्थान कालीन विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशी साजरी

व्यापारी प्रसाद मुंज यांना मिळाला पूजेचा मान

⚡सावंतवाडी,ता.१०-: येथील संस्थानकालीन विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशी भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. यनिमित्त मंदिरात विविध धार्मिक विधी पार पडले. यावर्षी पूजेचा मान व्यापारी प्रसाद मुंज यांना देण्यात आला. शहरासह परिसरातील सर्व भाविकांनी मोठ्या उत्साहाने श्रीचे दर्शन घेतले.

दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांची वर्दळ सुरु झाली होती. विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विठ्ठलाच्या नामजपाने परिसर मंगलमय झाला होता.

You cannot copy content of this page