गरजू महिलांना प्रत्येकी दहा हजारांची मदत

सामंत ट्रस्टची सामाजिक बांधिलकी

⚡सावंतवाडी ता.१०-: येथील कै.डॉ.भाऊसाहेब परुळेकर नर्सिंग होम येथे दोन गरजू निराधार महिलांना सामंत ट्रस्ट मुंबई तर्फे प्रत्येकी दहा हजार रुपयांचे धनादेश प्रदान करण्यात आले.

कोलगांव येथील लक्ष्मी दळवी या ७० वर्षांच्या दारिद्रय रेषेखालील निराधार आणि मधुमेह, उच्च रक्तदाब आजार असलेल्या आजीला आणि माणगाव येथील माधवी कुंभार या दारिद्रय रेषेखालील निराधार मातेला डॉ जयेंद्र परुळेकर यांच्या हस्ते हे धनादेश देण्यात आले.

You cannot copy content of this page