भेटीमुळे शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघणार असून चर्चेला उधाण
⚡सावंतवाडी ता.१०-: शिवसेनेचे माजी आमदार शंकरभाई कांबळी यांनी गुरुकुल येथे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांची घेतली भेट घेतली.परंतु या भेटीमुळे शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघणार असून चर्चेला उधाण आले आहे.
या भेटीदरम्यान पूर्वाश्रमीचे आक्रमक शिवसैनिक तसेच शिवसेनेचे माजी नगरसेवक उमेश कोरगावकर, माजी नगरसेवक सुरेश भोगटे, माजी नगरसेवक विलास जाधव, सावंतवाडी शहराची माजी शिवसेना शहर प्रमुख जावेद शेख यांच्याशी प्रदीर्घ चर्चा सुरू होती. यावेळी बबन साळगावकर यांनी शंकरभाई कांबळी यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. चर्चेचा तपशील समजू शकलेला नाही. यावेळी सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव, शिवाजी चौक मित्र मंडळाचे सचिव दीपक सावंत, राजा शिवाजी चौक मित्र मंडळाचे उपाध्यक्ष बंड्या तोरसेकर उपस्थित होते.
