रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊनच्या अध्यक्षपदी सुनील रेडकर तर सचिवपदी पंकज शिरसाट यांची निवड

⚡वेंगुर्ला ता.१०-: सन २०२२-२३ या रोटरी वर्षासाठी रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊनच्या अध्यक्षपदी सुनील रेडकर यांची, उपाध्यक्षपदी शंकर उर्फ राजू वजराटकर, सचिवपदी पंकज शिरसाट व खजिनदार म्हणून नितीन कुलकर्णी यांची निवड करण्यात आली आहे.

  या क्लबचा वार्षिक पदग्रहण सोहळा ११ जुलै २०२२ रोजी सायंकाळी ७ वाजता साई डिलक्स हॉल (साई मंगल कार्यालय) येथे संपन्न होणार आहे. या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे व इंस्टॉलिंग ऑफिसर म्हणून डिस्ट्रिक्ट गव्हर्नर ईलेक्ट नासिर बोरसदवाला, असिस्टंट गव्हर्नर दिपक बेलवलकर, असिस्टंट गव्हर्नर नीता गोवेकर उपस्थित राहणार आहेत.

  १ जुलै रोजी सुरू होणा-या नूतन रोटरी वर्षासाठी वेंगुर्ला रोटरी क्लबच्या नूतन कार्यकारिणीत अध्यक्ष- सुनील रेडकर, सचिव- पंकज शिरसाट, उपाध्यक्ष- राजू वजराटकर, खजिनदार- नितीन कुलकर्णी, तसेच बोर्ड ऑफ डायरेक्टरसाठी क्लब सव्र्हिस- संजय पुनाळेकर, व्होकेशनल सर्विस- राजन गावडे, पब्लिक इमेज- दिलीप गिरप, इंटरनॅशनल सव्र्हिस- राजेश घाटवळ, कम्युनिटी सव्र्हिस- सुरेंद्र चव्हाण, युथ सव्र्हिस- योगेश नाईक, रोटरी फाऊंडेशन- गणेश अंधारी, मेंबरशीप- सचिन वालावलकर, सव्र्हिस प्रोजेक्ट- पिटर रॉड्रिक्स, लिटरसी- आनंद बांदेकर, हायजीन व सॅनिटेंशन- नागेश गावडे, स्पोर्ट्स- अनमोल गिरप, टीच अँड विन- आशिष शिरोडकर व अजित धारगळकर, पोलिओ- वसंतराव पाटोळे, एडिटर- सदाशिव भेंडवडे व वसंतराव पाटोळे आणि सार्जंट ऑफ आर्म-आशुतोष मसुरकर व दिलीप शितोळे यांच्या समावेश आहे.

  रोटरी इंटरनॅशनलच्या या वर्षीच्या प्रेसिडेंट जेनिफर जोन्स यांनी दिलेल्या ईमँजीन रोटरी या यंदाच्या थीम प्रमाणे व डिस्ट्रिक्ट गव्हर्नर व्यंकटेश उर्फ बबन देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण रोटरी वर्षात समाजाभिमुख विविध कार्यक्रम ‘‘दिल से‘‘ घेण्यात येणार आहेत. याचाच एक भाग म्हणून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करुन वेंगुर्ला तालुक्याचा नावलौकिक वाढविणा-या दिलीप गिरप (उत्कृष्ट नगराध्यक्ष नॅशनल अवॉर्ड), सेंद्रा फर्नांडिस (फॉरेन्सिक सायन्स गोल्ड मेडल), तेजस मेस्त्री (एम ए- गायन- गोल्ड मेडल), स्नेहा नार्वेकर (जलतरण विश्वविक्रम) व राजेंद्र निंबाळकर (चार्टर्ड प्रेसिडेंट दोडामार्ग), रोटरी परिवारातील राजेश घाटवळ (असिस्टंट गव्हर्नर २०२१-२२), विवेक शिरसाट- (जिल्हापरिषद गुणवंत कर्मचारी पुरस्कार), तन्वी शितोळे (उच्च माध्यमिक परीक्षेत विशेष प्राविण्य), अथर्व अंधारी (शालांत विशेष प्राविण्य), साईराज सामंत (उत्कृष्ट बॅडमिंटनपटू), आर्ची नाईक (सिंधुदुर्ग टॅलेंट सर्च कांस्य पदक) या व्यक्तींचा सन्मान करण्यात येणार आहे.

  तरी या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन वेंगुर्ला रोटरी क्लबच्यावतीने प्रेसिडेंट सुनील रेडकर यांनी केले आहे.
You cannot copy content of this page