मळगाव देवस्थानाचे जेष्ठ मानकरी दत्ताराम उर्फ दत्तूभाऊ राऊळ यांचे निधन
⚡सावंतवाडी ता.२७- : मळगाव कुंभार्ली, कोल्ह्याची गाळी येथील रहिवासी मळगाव देवस्थानचे जेष्ठ मानकरी तथा वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ हरिभक्त दत्ताराम उर्फ दत्तूभाऊ गोविंद राऊळ (९० ) यांचे आज रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. मळगाव परिसरात ते एक दूध व्यावसायिक म्हणूनही प्रसिद्ध होते. मळगाव येथील वारकरी संप्रदायातील एक प्रमुख वारकरी वै. ह.भ.प. दिगंबर नाटेकर यांचे ते सहकारी राहिले…
