काँग्रेसचे प्रभारी जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांचा मालवण काँग्रेसतर्फे सत्कार

⚡मालवण ता.२७-: सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीच्या प्रभारी अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल इर्शाद शेख यांची ओरोस येथे मालवण तालुका काँग्रेस कमिटी तर्फे भेट घेऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. जिल्ह्यात होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपरिषद निवडणूक आढावा घेण्यासाठी लवकरच मालवण तालुक्यात येऊन कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊ, असे यावेळी प्रभारी जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांनी सांगितले.

यावेळी मालवण तालुका काँग्रेस अध्यक्ष तथा जिल्हा बँक संचालक मेघनाद धुरी, ज्येष्ठ नेते साईनाथ चव्हाण, विधानसभा मतदार संघ नेते अरविंद मोंडकर, संदेश कोयंडे, माजी शहर अध्यक्ष जेम्स फर्नांडिस, सेवादल तालुकाध्यक्ष चंदन पांगे, बाबा मेंडीस, श्रीहरी खवणेकर, लक्ष्मीकांत परुळेकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page