काझी शहाबुद्दीन हॉलमध्ये आयोजन; लकी ड्रॉ, विशेष ऑफर्ससह विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमांची मेजवानी..

सावंतवाडी ता.३० : ओंकार मित्रमंडळ, भटवाडी यांच्या वतीने दिवाळीनिमित्त दिवाळी निर्मिती विशेष प्रदर्शन व खरेदी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव दि. ४, ५ व ६ नोव्हेंबर २०२६ रोजी सावंतवाडी येथील काझी शहाबुद्दीन हॉल येथे होणार आहे.
या प्रदर्शनात दिवाळीनिमित्त विविध वस्तू व उत्पादनांची खरेदी करण्याची संधी नागरिकांना उपलब्ध होणार आहे. विशेषतः महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, लहान मुलांसाठी मनोरंजनात्मक खेळांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच प्रदर्शनाला भेट देणाऱ्या ग्राहकांसाठी लकी ड्रॉ आणि विशेष ऑफर्स ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी मोठ्या संख्येने या प्रदर्शनाला भेट देऊन खरेदीचा आनंद घ्यावा आणि महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, असे आवाहन ओंकार मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.”
