⚡मालवण ता.२७-: सिंधुदुर्ग महाविद्यालयात एनसीसी विभागाच्या वतीने कारगिल विजय दिन साजरा करण्यात आला. यावेळी ५८ महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल दीपक दयाळ( सेना मेडल प्राप्त) यांनी शस्त्र पूजन करून कारगिल युद्धा विषयी उपस्थितांना माहिती दिली.
विद्यार्थ्यांमध्ये देशाबद्दल राष्ट्रप्रेम निर्माण व्हावे, देशासाठी व समाजासाठी सर्व विद्यार्थ्यांनी काम करावे यासाठी अर्थशास्त्र विषयाचे प्राध्यापक लेफ्टनंट डॉ. एम. आर. खोत (असोसिएट एनसीसी ऑफिसर, कंपनी कमांडर ५८ महाराष्ट्र बटालियन) व एनसीसी सीनियर्स तेजस पोळ नारायण मुंबरकर मिथील मोरवेकर त्याचबरोबर सर्व एनसीसी कॅडेट यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
यावेळी प्राचार्य डॉ. उज्वला सामंत यांनी कर्नल दीपक दयाळ व सुभेदार मेजर गेडाम यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. यावेळी कर्नल दीपक दयाळ यांनी कारगिल युद्ध कसे झाले, त्याची कारणे कोणती त्याचबरोबर भारताने विजय कसा मिळवला याविषयी माहिती दिली. मुलांमध्ये ऊर्जा निर्माण करत व देश प्रेम जागृत केले. तर प्राचार्या डॉ. उज्वला सामंत मॅडम यांनी कारगिल विजय दिनानिमित्त एनसीसी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्याचबरोबर कॉलेजचे सर्व प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी एनसीसी व कॉलेजचे इतर विद्यार्थी देखील उपस्थित होते.
