Headlines

उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांची जि.प. शाळा क्रमांक ४ व ५ दत्तक घेण्याची घोषणा…

⚡सावंतवाडी ता.०७-: भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा आदर्श घेऊन सावंतवाडीतील जि.प. शाळा नंबर ४, व शाळा नं. ५ या दत्तक घेत असल्याची घोषणा उपनगराध्यक्ष ॲड अनिल निरवडेकर यांनी केली. माझही शिक्षण जिल्हा परिषद शाळेत झालं आहे. आज या शाळेच्या मुलांनी मिळवलेल यश कौतुकास्पद आहे. शिक्षकांच्या मेहनतीला दाद द्यावी तेवढी थोडी आहे, असे उद्गार ॲड. निरवडेकर यांनी काढले. जि. प. पू. प्राथमिक शाळा सावंतवाडी नं. ४ येथे आयोजित गुणगौरव सोहळ्यात ते बोलत होते.

उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांच्या माध्यमातून शिष्यवृत्ती परिक्षेत यश संपादन केलेल्या प्रशालेतील मुलांचा गौरव यावेळी करण्यात आला. गुणवंत विद्यार्थ्यांना पंचायत समिती उपसभापती गौरव मुळीक, उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर व मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व बक्षीस देत गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने ॲड. निरवडेकर यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक महेश पालव यांचा वाढदिवस देखील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी पंचायत समिती उपसभापती गौरव मुळीक यांनी मनोगत व्यक्त केले. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच अनुकरण करणारे आम्ही कार्यकर्ते आहोत.‌ त्यामुळे जिल्हा परिषद शाळांना कोणतीही कमी पडू देणार नाही. रिक्त असलेल्या पदावर चांगले शिक्षक लवकरात लवकर देऊ असा शब्द श्री. मुळीक यांनी दिला. तसेच नगरसेवक ॲड. सिद्धार्थ भांबुरे, पत्रकार हरिश्चंद्र पवार, विनायक गांवस, छावा संघटना सावंतवाडीचे अध्यक्ष संतोष तळवणेकर आदींनीही यावेळी मनोगत व्यक्त केली. याप्रसंगी सावंतवाडीचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, पंचायत समिती उपसभापती गौरव मुळीक, नगरसेवक ॲड. सिद्धार्थ भांबुरे, छावा संघटना अध्यक्ष संतोष तळवणेकर, मुख्याध्यापक महेश पालव, साईनाथ जामदार, शेलेस्तीन फर्नांडिस,शिवा गावडे, ज्ञानेश्वर पारधी, शिक्षीका श्रीम. पूजा शिंदे, श्रीम‌. अनघा निरवडेकर, श्रीम. लक्ष्मी धारगळकर, श्रीम. अंजना घाडी, श्रीम. प्रणिती सावंत, श्रीम. दक्षता गवस, श्रीम. वर्षा नाईक, श्रीम. शिल्पा जाधव आदींसह शिक्षक, पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page