Headlines

आंबोलीच्या रमाईनगरातील ८ लाखांचा रस्ता दहा दिवसांच्या पावसातच उखडला..

मोरी खचली, रस्त्यावर खडी उघडी पडली, ठेकेदारावर कारवाईची मागणी..

आंबोली, ता. ७: येथील रमाईनगर येथील समाजकल्याण विभागाच्या निधीतून मे महिन्यात केलेला रस्ता बोगस काम केल्याने उखाडला आहे. पाऊस फक्त १० दिवस च झाला अजून पूर्ण पावसात संपूर्ण रस्ता उखडणार आहे. येथील ग्रामस्थांनी या रस्त्याची चोकशी ची मागणी केली आहे. आंबोली रमाईनगर येथे में महिन्यात समाजकल्याण विभागाचा ८ लाख रुपये निधी मंजुरीतून एका मोरीचे काम आणि २० मीटर रस्त्याचे काम करण्यात आले. संबंधित काम हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत ठेकेदाराने केले. मात्र हे काम करताना ठेकेदाराने हलगर्जी पणा केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. सध्या फक्त १० दिवस पाऊस होऊन मोरी मध्ये खचली आहे. तर रस्ता करताना सिमेंट कमी वापरल्याने सखेरा पूर्ण पणे आणि आतली खडी दिसत आहे. रस्ता उखडाला आहे. संबंधित ठेकेदाराने या ठिकाणी कामाचा फलक देखील लावलेला नाही. ८ लाखात हे काम असून संपूर्ण कामाची महिनाभरात दुरावस्था झाली आहे. अजून पूर्ण पावसाळाभर हे काम संपूर्ण उखडणार आहे त्यामुळे या कामाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. पालक मंत्री नितेश राणे यांनी बोगस काम करणाऱ्या ठेकेदारांची गय करणार नसल्याचे सांगितले.इथल्या ग्रामस्थांनी प्रत्यक्षात या ठिकाणी येऊन कामाची पाहणी करून ठेकेदारवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

You cannot copy content of this page