Headlines

“असामान्य कर्तृत्व आणि अफाट दातृत्व असलेले विशालजी परब भविष्यात सर्वमान्य नेतृत्व ठरतील”…

बबन साळगांवकर: विशाल परब यांच्या माध्यमातून भटवाडी शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप…

⚡सावंतवाडी, ता. ७-: महाराष्ट्र भाजपचे युवानेते विशालजी परब यांच्या माध्यमातून तसेच भारतीय जनता पक्षाच्या वतीने सावंतवाडीतील भटवाडी शाळा क्रमांक ६ येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष बबनराव साळगांवकर, महिला व बालकल्याण सभापती सौ. दिपाली भालेकर, नगरसेविका सौ. सुनिता पेडणेकर, दिलीप भालेकर आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना माजी नगराध्यक्ष बबनराव साळगांवकर यांनी विशालजी परब यांच्या सामाजिक कार्याचे विशेष कौतुक केले. “असामान्य कर्तृत्व आणि अफाट दातृत्व असलेले विशालजी परब हे येणाऱ्या काळातील सर्वमान्य व सक्षम नेतृत्व ठरतील, याबाबत तिळमात्र शंका नाही,” असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, गेली अनेक वर्षे विशाल परब हे शैक्षणिक साहित्य, छत्री, टी-शर्ट, शिधा वाटप, आपत्तीग्रस्तांना मदत तसेच वैद्यकीय सहाय्य अशा विविध समाजोपयोगी उपक्रमांद्वारे मतदारसंघातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचले आहेत. त्यांच्या सातत्यपूर्ण सेवाभावी कार्यामुळे समाजात त्यांच्याविषयी विश्वास निर्माण झाला आहे.
भटवाडी शाळेतील विविध अडचणींबाबत विशाल परब यांच्याशी चर्चा करून त्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाहीही साळगांवकर यांनी यावेळी दिली.
कार्यक्रमास कुणाल शुंगारे, मिसबा शेख, प्रसाद कशाळीकर, नवल साटेलकर, धिरेंद्र म्हापसेकर, केतन आजगांवकर, गुरू पेडणेकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page