श्री. दिलीप गिरप ; वेंगुर्ला नगरपरिषद विशेष सभा संपन्न
वेंगुर्ला
सिंधूरत्न समृद्धी विकास योजना अंतर्गत वेंगुर्ला मच्छीमार्केटचे विस्तारीकरण करण्यात येणार आहे.तसेच शासनामार्फत नव्याने देण्यात आलेल्या “घनकचरा व्यवस्थापन मोहीम ” व्यापक स्तरावर व योग्य पद्धतीने राबवून पुन्हा एकदा वेंगुर्ला शहर स्वच्छतेच्या बाबतीत अधिक सुंदर बनविण्यासाठी वेंगुर्ला नगरपरिषद नागरिकांच्या सहकार्याने प्रयत्न करण्याचे आजच्या सभेत निश्चित करण्यात आले.
वेंगुर्ला नगरपरिषदेची विशेष सर्वसाधारण सभा आज मंगळवारी (दि. 7 जुलै )नगरपरिषद श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, मुख्याधिकारी हेमंत किरूळकर, सभापती प्रणव वायंगणकर, गौरी मराठे, रिया केरकर, गौरी माईणकर, युवराज जाधव, सभापती सचिन शेट्ये, नगरसेवक संदेश निकम, रवींद्र शिरसाट, विनय नेरुरकर, सुधीर पालयेकर, प्रशांत आपटे, प्रीतम सावंत, नगरसेविका लीना म्हापणकर, समिधा रेडकर, आकांक्षा परब, सुषमा प्रभूखानोलकर, शीतल आंगचेकर, काजल कुबल तसेच विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते.यावेळी
हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियान अंतर्गत 50 टक्के निधी पर्यटन विकासासाठी व 50 टक्के निधी महिला आरोग्य सेवासाठी वापरण्याबाबत सूचना व निश्चिती करण्यात आली. यावेळी वेंगुर्ला नगरपरिषद घनकचरा व्यवस्थापन नवी मोहीम व्यापक स्तरावर राबविणार असल्याचे मुख्याधिकारी हेमंत किरुळकर यांनी बोलताना स्पष्ट केले.
