आंबोली गेळे येथे बंद घरात चोरी…

कपाटातील १ लाखाची रोकड चोरट्यांनी केली लंपास; पोलिस घटनास्थळी दाखल

⚡आंबोली ता.२७-: आंबोली गेळे डुरेवाडी येथील एका बंद घराचे कुलूप तोडून कपाटात ठेवण्यात आलेली एक लाख रुपयाची रोकड चोरट्याने लंपास केली आहे. या घटनेची माहिती मिळताच डी वाय एस पी रोहिणी साळुंखे, पोलिस निरीक्षक शंकर कोरे, अमित गोते यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे.

यावेळी चोरट्याने कपाटातील एका कप्प्यातील पैसे चोरून नेले असून, दुसऱ्या कप्प्यातील पैसे तसेच आहेत. अशी माहिती प्राप्त झाली आहे. याबाबत अधिक तपास पोलीस राजेश नाईक,. दीपक शिंदे, संभाजी पाटील करत आहेत.

You cannot copy content of this page