⚡कणकवली ता.२७-: लातूर थाई बॉक्सिंग असोसिएशन यांच्यातर्फे आयोजित 18 व्या महाराष्ट्र राज्यस्तरीय स्थायी बॉक्सिंग स्पर्धेत बाल शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूलच्या कु. दिशा सतीश पवार 14 वर्षाखालील वयोगटात अप्रतिम अशी कामगिरी करत सुवर्णपदकाला आपल्याकडे हिरावून घेतले. शाळेचा एक मानाचा तुरा रोवला.
जागतिक काही बॉक्सिंग फेडरेशन, भारतीय थाई बॉक्सिंग असोसिएशन, महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमान लातूर येथे आयोजित केलेल्या स्पर्धेत उत्कृष्ट अशी कामगिरी बजावत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शालेय पातळीवरील थाई बॉक्सिंग चे पहिले सुवर्णपदकाचा मान कु. दिशा पवार हिने रोवला आहे. तसेच पंजाब येथे होणाऱ्या राष्ट्रीय थाई बॉक्सिंग स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे.
कु. दिशा पवार हिचे कौतुक संस्थेच्या सेक्रेटरी सुलेखा राणे, रमेश राणे, अभिजीत सावंत, प्रणाली सावंत, संदीप सावंत, महेश पाटील यांनी केला. शाळेच्या क्रीडा शिक्षिका जिस्मा नायर आणि जागतिक बॉक्सिंग असोसिएशनचे प्रशिक्षण विवेक राणे त्यांच्याकडून मार्गदर्शन लाभले.तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री. कृष्णा जाधव यांच्याकडून स्पर्धेसाठी मोलाचे प्रोत्साहन मिळाले.
