जिल्ह्यात कार्डियाक नसल्याने मुंबईवरून आली होती मागविण्यात;
मात्र, तिचा झाला नाही उपयोग
⚡सावंतवाडी ता.२७-: जिल्ह्यात कार्डीयाक ॲम्ब्युलन्स उपलब्ध नसल्याने मुंबईहून मागविण्यात आलेल्या कार्डीयाक ॲम्ब्युलन्सचा टायर फुटून माडखोल येथे झालेल्या अपघातात मुंबई येथे उपचारासाठी घेऊन जाण्यात येणाऱ्या रुग्णाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अपुरी आरोग्य यंत्रणा पुन्हा एकदा उघडी पडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सावंतवाडी येथील लक्ष्मण सावंत यांना अधिक उपचारासाठी मुंबई येथे नेत असताना हा अपघात झाला. त्यामुळे त्यांच्यावर वेळेत उपचार होऊ शकते नाहीत.
