Headlines

महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांसोबत भाजप शिष्टमंडळाची बैठक…

सावंतवाडीतील वीजपुरवठा लवकर सुरळीत करण्याचे आश्वासन..

⚡सावंतवाडी, ता. ७-: सावंतवाडी तालुक्यातील ग्रामीण भागात पावसामुळे निर्माण झालेल्या वीजपुरवठ्याच्या गंभीर समस्येच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या शिष्टमंडळाने कुडाळ येथे महावितरणच्या अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंत्यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. यावेळी सावंतवाडी तालुक्यातील वीजपुरवठा लवकरात लवकर सुरळीत करण्याचे आश्वासन महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांनी दिले.

बैठकीत जिल्हा परिषद सदस्य संदिप गावडे, सावंतवाडी पंचायत समितीचे उपसभापती गौरव मुळीक तसेच भाजप मंडलाध्यक्ष संतोष राऊळ यांनी तालुक्यातील विविध गावांमधील वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, पावसामुळे निर्माण झालेल्या अडचणी आणि नागरिकांना होत असलेल्या गैरसोयींकडे अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. तसेच अनेक गावांमध्ये अद्याप वायरमन उपलब्ध नसल्याने वीजपुरवठा पूर्ववत होण्यास विलंब होत असल्याची बाब निदर्शनास आणून देत अशा गावांमध्ये तातडीने वायरमनची नियुक्ती करण्याची मागणी करण्यात आली.
सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ग्रामीण भागात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असून त्यावर तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अन्यथा नागरिकांच्या तीव्र रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही भाजप शिष्टमंडळाने यावेळी दिला.
या बैठकीस माजी सभापती पंकज पेडणेकर, कासचे सरपंच प्रविण पंडित, सांगेलीचे सरपंच लवू भिंगारे, गेळेचे सरपंच सागर ढोकरे, चौकुळचे सरपंच गुलाबराव गावडे, शंकर सावंत, गणेशप्रसाद पेडणेकर तसेच भारतीय जनता पार्टीचे सावंतवाडी तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page