मळगाव देवस्थानाचे जेष्ठ मानकरी दत्ताराम उर्फ दत्तूभाऊ राऊळ यांचे निधन

⚡सावंतवाडी ता.२७- : मळगाव कुंभार्ली, कोल्ह्याची गाळी येथील रहिवासी मळगाव देवस्थानचे जेष्ठ मानकरी तथा वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ हरिभक्त दत्ताराम उर्फ दत्तूभाऊ गोविंद राऊळ (९० ) यांचे आज रात्री वृद्धापकाळाने निधन झाले.

मळगाव परिसरात ते एक दूध व्यावसायिक म्हणूनही प्रसिद्ध होते. मळगाव येथील वारकरी संप्रदायातील एक प्रमुख वारकरी वै. ह.भ.प. दिगंबर नाटेकर यांचे ते सहकारी राहिले होते. ते दरवर्षी न चुकता नियमित वारी करायचे. मळगाव देवस्थानच्या सर्वच कार्यक्रमांमध्ये ते हिरीरीने सहभाग घेत असत. वृद्धापकाळमुळे ते सध्या घरीच असायचे. त्यातच आज सायंकाळी त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे चार मुली, सुना, पुतणे, पुतण्या, नातवंडे, नातसून, पतवंडे असा मोठा परिवार आहे.

You cannot copy content of this page