⚡कणकवली ता.२८-: श्री संस्थान शांताश्रम मठाधिपती प.पू. वैश्यगुरु श्री श्री वामनाश्रम महास्वामींचा चातुर्मास व्रत सोहळा निमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्कॉलरशिप प्राप्त दहावी, बारावी, पदवी मध्ये 60% हून अधिक गुण मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा भेटवस्तू देऊन सत्कार कणकवली तालुका वैश्य समाज आणि चातुर्मास सेवा समिती सिंधुदुर्ग यांनी आयोजित केला होता . यावेळी जिल्ह्याभरातील सुमारे १५० विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.
प्रास्ताविक भाषणात वैश्य समाज कणकवली तालुका अध्यक्ष दादा कुडतरकर म्हणाले, शिक्षणातील विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवण्यासाठी करिअर नियोजन करण्यासाठी स्वतःची क्षमता आणि बलस्थाने ओळखून स्वतःला आवडेल असे क्षेत्र निवडा व त्यात आपली प्रगती साधावी असे सांगितले.
यानिमित्त युरेका सायन्स क्लबच्या संस्थापिका सुषमा केनी आणि भूषण पांगम यांची मुलाखत स्मिता नलावडे यांनी घेतली. यामध्ये आजची शिक्षण पद्धती, संस्कार आणि करियर संबंधी अनेक प्रश्नांचा उलगडा करून माहिती दिली.
यानंतर शिवसेना नेते संदेश पारकर यांनी गुणवंत विद्यार्थ्यांनी खूप ज्ञान मिळवून समाजाचे नाव उज्वल करावे, यासाठी जे सहाय्य लागेल त्यासाठी आपण तत्पर आहोत, असे सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष उद्योगपती,विश्वस्त वैश्य गुरुमठ हळदीपूर अशोक नर, यांनी विद्यार्थ्यांनी जरी गुणवत्ता मिळवली तरी संस्कारापासून दूर राहू नये, इंग्लिश मीडियमच्या भुलभुलय्याच्या मागे न लाग लागता मातृभाषेतून शिक्षण घ्यावे. स्वतःची आवड क्षमता ओळखून निर्णय घ्यावा अभ्यास करताना मोबाईलचा वापर करताना कोणती काळजी घ्यावी यासंबंधी मार्गदर्शन केले.
महिला उद्योजिका नीलम धडाम यांनी 10 व 12 मध्ये प्रथम क्रमांक ने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना रोख स्वरूपात बक्षिसे देऊन गौरविले.श्री श्री वामनाश्रम स्वामींच्या उपस्थितीत हा गुणगौरव सोहळा संपन्न झाला. दीपक अंधारी, लहू पिळणकर, महेंद्र कुमार मुरकर, उमेश वाळके, प्रसाद अंधारी, महिला चातुर्मास सेवा समितीने शुभेच्छा दिल्या निवेदन व आभार दिवाकर मुरकर यांनी मानले. स्मिता नलावडे यांनी मार्गदर्शन केले.
