Headlines

बंद घर फोडून ३३ हजारांचा मुद्देमाल जप्त

कोलगाव येथील घटना सावंतवाडी ता.३०-:कोलगाव येथील बंद घर फोडून अज्ञात चोरट्याने ३३ हजार रुपयाचा मुद्देमाल लंपास केला असल्याची घटना आज उघडकीस आली आहे. या अज्ञात चोरट्याने रोख रक्कमेसह तांब्या- पितळीच्या भाड्यांसह एक जुना कॅमेरा चोरून नेला आहे. याबाबत दिलेल्या तक्रारीनुसार पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read More

दशावतार प्रेमींकडून चंद्रशेखर कविटकरला आर्थिक मदत

⚡बांदा ता.३०-: घारपी (ता. दोडामार्ग) येथील नामवंत दशावतार कलाकार कै. सखाराम कविटकर यांचा अपंग मुलगा चंद्रशेखर याला बांद्यातील दशावतार प्रेमींकडून आर्थिक मदत देण्यात आली. बँक आॅफ इंडियाच्या बांदा शाखाचे व्यवस्थापक अंकित धवन यांच्या हस्ते ही मदत सुपूर्द करण्यात आली. सदर अपंग तरुणाला शासन दरबारातून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असे बांदा सरपंच अक्रम खान यांनी…

Read More

पंचम खेमराजचे ग्रंथालय परिचर तुळशीदास मयेकर सेवानिवृत्त

संस्थेकडून देण्यात आल्या शुभेच्छा ⚡सावंतवाडी ता.३०-: श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी येथील ग्रंथालय परिचर श्री तुळशीदास मयेकर हे आपल्या नियत वयोमानानुसार वयाच्या ६० व्या वर्षी महाविद्यालयांमधून निवृत्त झाले . ३२ वर्षे त्यांनी महाविद्यालयात सेवा केली. त्यांच्या निवृत्तीविषयक कार्यक्रमासाठी सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष राजेसाहेब श्रीमंत खेमसावंत भोंसले , कार्याध्यक्षा सौ. शुभदादेवी खेमसावंत भोंसले, संस्थेचे…

Read More

राज्यपाल कोश्यारी यांच्या ‘ त्या ‘ वक्तव्याचा जिल्हा काँग्रेसने केला निषेध

जिल्हाध्यक्ष इरर्शाद शेख यांची माहिती ⚡ओरोस ता.३०-: मुंबईमधून गुजराती आणि राजस्थानी लोक गेल्यावर मुंबई ही आर्थिक राजधानी राहणार नाही, मुंबईमध्ये पैसाच राहणार नाही असे विधान करून महाराष्ट्रातील तमाम जनतेचा अपमान राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी केला आहे त्याचा सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतो असे सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष इर्शाद शेख यांनी माध्यमांशी बोलताना…

Read More

निष्ठावान शिवसैनिकांची ताकद दाखविण्याची वेळ आली

१ ऑगस्टच्या निष्ठा यात्रेत सहभागी व्हा;तालुकाप्रमुख यशवंत परब यांचे आवाहन वेंगुर्ला: सावंतवाडी विधानसभा मतदार संघातील निष्ठावान शिवसेनेची जी ताकद आहे ती दाखवण्याची वेळ आली आहे. शिवसेना पक्षावरील निष्ठावान शिवसैनिकांनी १ ऑगस्ट रोजी होणाऱ्या आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याला मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेना तालुकाप्रमुख यशवंत परब यांनी केले आहे. माजी पर्यटनमंत्री, शिवसेना नेते व…

Read More

मळगाव येथील शारदा विद्यालय मळगाव शाळेची जनरल पालक सभा संपन्न

⚡सावंतवाडी ता.३०-: मळगाव रस्तावाडी येथील शारदा विद्यालय मळगाव या जिल्हा परिषद शाळेची जनरल पालक सभा पालकांच्या उपस्थितीत खेळीमेळीत पार पडली. या सभेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दाजी सावंत, शाळेच्या मुख्याध्यापिका अनुराधा सुर्वे, शिक्षिका सीमा सावंत, विश्वनाथ गोसावी, गोपाल नार्वेकर, सिद्धेश तेंडोलकर, कृष्णा गावडे, पालक विजय ठाकूर, सच्चीदानंद मेस्त्री, विश्वनाथ…

Read More

हर घर तिरंगा उपक्रम यशस्वी करण्याचा निर्धार

वेंगुर्ले नगरपरिषदेत नियोजन बैठक संपन्न वेंगुर्ला प्रतिनिधी- वेंगुर्ला नगरपरिषदेच्यावतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत ‘हर घर तिरंगा‘ उपक्रम राबविण्याबाबत बैठक संपन्न झाली. स्वराज्य महोत्सव २०२२ अंतर्गत वेंगुर्ला नगरपरिषद हद्दीत ९ ते १७ ऑगस्टया कालावधीत सर्वांनी मिळून हा उपक्रम यशस्वी करण्याचा निर्धार वेंगुर्ला नगरपरिषद छत्रपती शिवाजी महाराज सभागृह येथे झालेल्या बैठकीत करण्यात आला. यावेळी मुख्याधिकारी डॉ.अमितकुमार सोंडगे…

Read More

महारक्तदान शिबिराला मोठा प्रतिसाद

गणेशोत्सव मंडळ व सिंधुरत्न रक्त मित्र प्रतिष्ठानचे आयोजन बांदा/प्रतिनिधीबांदा शहरात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ विठ्ठल मंदिर बांदा व सिंधुरत्न रक्त मित्र प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महारक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला यावेळी वाफोली पै काणे ग्रुपचे मॅनेजर संदीप रेडकर , बांदा आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ . जगदीश पाटील, डॉ. मयुरेश पटवर्धन , पेडणे नगरपालिकेचे नगराध्यक्ष…

Read More

चराठा उपविभाप्रमुख पदी चंद्रकांत उर्फ राजू कुबल

⚡सावंतवाडी ता.३०-: माजगाव जिल्हा परिषद चराठा पंचायत समिती उपविभाग प्रमुख पदी चंद्रकांत उर्फ राजू कुबल. यांची निवड करण्यात आली आहे. जिल्हाप्रमुख संजय पडते .यांनी तसे पत्र दिले आहे यावेळी आमदार वैभव नाईक,तालुकाप्रमुख रुपेश . सावंतवाडी विधानसभा प्रमुख विक्रांत विकास भाई सावंत. उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार. बाळा गावडे. सरपंच दिनेश सावंत. माजी सरपंच तथा उपतालुकाप्रमुख आबा सावंत….

Read More

शास्त्रीय संगीतामध्ये स्वत:चा दबदबा निर्माण करावा…

वामन पंडित;आचरेकर प्रतिष्ठान आयोजित गुरुपौर्णिमा कार्यक्रमाचा शुभारंभ ⚡कणकवली ता.३०-: कोणतीही कला शिकणे ही कष्टप्रद गोष्ट आहे. तसेच पंडित जितेंद्र अभिषेकी यांचे शिष्य पं. समीर दुबळे हे आपल्या गुरुंच्या शास्त्रीय संगीताच्या ज्ञानाचा वसा पुढे नेण्याचे काम करीत आहेत. सिंधुदुर्गातील संगीत प्रिय विद्यार्थ्यांना शास्त्रीय संगीत शिकवण्याचे पं. समीर दुबळे करीत आहेत. त्यांच्या शिष्यांनी देखील पंडित जीतेंद्र अभिषेकी…

Read More
You cannot copy content of this page