१ ऑगस्टच्या निष्ठा यात्रेत सहभागी व्हा;तालुकाप्रमुख यशवंत परब यांचे आवाहन
वेंगुर्ला: सावंतवाडी विधानसभा मतदार संघातील निष्ठावान शिवसेनेची जी ताकद आहे ती दाखवण्याची वेळ आली आहे. शिवसेना पक्षावरील निष्ठावान शिवसैनिकांनी १ ऑगस्ट रोजी होणाऱ्या आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याला मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेना तालुकाप्रमुख यशवंत परब यांनी केले आहे.
माजी पर्यटनमंत्री, शिवसेना नेते व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे १ ऑगस्ट रोजी निष्ठा यात्रेनिमित्त सावंतवाडी येथे येत आहेत. यावेळी वेंगुर्ला तालुक्यातील या सभेला उपस्थित राहण्यासंदर्भात आज तालुका शिवसेनेची नियोजन बैठक शिवसेना शाखेत संपन्न झाली. यावेळी विभाग निहाय गाड्यांचे नियोजन करून जास्तीत जास्त कार्यकर्ते व शिवसैनिक सावंतवाडी येथे या सभेला उपस्थित राहण्याचा निर्धार करण्यात आला. यावेकी तालुकाप्रमुख यशवंत उर्फ बाळू परब यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी शहर प्रमुख अजित राऊळ, उपजिल्हाप्रमुख बाळा दळवी, सचिन देसाई, महिला तालुका संघटिका सुकन्या नरसुले, शहर समन्वयक विवेक आरोलकर, माजी नगराध्यक्ष संदेश निकम, माजी नगरसेवक तुषार सापळे, वायंगणी सरपंच सुमन कामत, संजय गावडे, श्रीकांत घाटे, संजय परब, उमेश नाईक, मनोहर येरम, नेहा साळगावकर यांच्यासाहित शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
