मालवण (प्रतिनिधी)

जागतिक मानसिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून लायन्स क्लब मालवणच्या वतीने महिलांसाठी मानसिक आरोग्यविषयक जनजागृतीपर व्याख्यानाचे संपन्न झाले. महिलांनी दैनंदिन जीवनातील विविध जबाबदाऱ्या सांभाळताना स्वतःच्या मानसिक आरोग्याकडेही विशेष लक्ष देणे आवश्यक आहे, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या कार्यक्रमात प्राध्यापिका सौ. घोगल यांनी ‘महिलांनी मानसिक आरोग्य कसे जपावे?’ या विषयावर मार्गदर्शन केले. महिलांच्या आयुष्यात मानसिक स्वास्थ्याचे असलेले महत्त्व, कौटुंबिक व सामाजिक जबाबदाऱ्या सांभाळताना मानसिक संतुलन राखण्याची गरज तसेच स्वतःच्या आरोग्याला प्राधान्य देण्याचे महत्त्व या विषयांच्या अनुषंगाने मार्गदर्शन करण्यात आले. शारीरिक आरोग्याइतकेच मानसिक आरोग्यही महत्त्वाचे आहे, असे यावेळी सांगण्यात आले.
यावेळी लायन्स क्लब ऑफ मालवणचे अध्यक्ष सहदेव बापर्डेकर, खजिनदार राधिका मोंडकर, जयश्री हडकर, गणेश प्रभुलकर, वैशाली शंकरदास, मनाली दळवी, राजा शंकरदास, मीना घुर्ये, फॅनी फर्नांडिस, रूपा कांदळगावकर तसेच नगरसेविका अश्विनी कांदळकर आदी उपस्थित होते.
